Murder  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime: बांधावरील झाडाच्या हिश्‍शाच्या वादातून लहान्याने केला मोठ्या भावाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : वडिलोपार्जित शेताच्या बांधावर असलेले सागाचे झाड सामुदायिक असून, त्याच्या हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावावर धारदार कोयत्याने मानेवर व पाठीवर वार करून जागीच ठार केले.

इतरांनी सोडविण्यासाठी गेलेल्यांनाही मारहाण करून ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन जण जखमी झाले. याबाबत धडगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील कमोद बुद्रुक येथे ही घटना घडली. (younger killed his elder brother due to dispute over share of tree on farm Nandurbar Crime)

कमोद बुद्रुक (ता. धडगाव) येथे रमेश दादला पावरा (वय ५०) व थिक्या दादला पावरा (४१) या दोघा भावांचे वडिलोपार्जित शेतीतून दोन हिस्से पाडण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही हिश्‍शांच्या शेताच्या बांधावर सागवान झाड आहे.

या झाडाच्या हिस्से वाटणीवरून दोन्ही भावंडे व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शेतातच वाद झाला. त्यानंतर घरी आले. मात्र रात्री आठच्या सुमारास पुन्हा दोघा भावांमध्ये वाद सुरू झाला. या वादात थिक्या पावरा या लहान भावाने व त्याची मुले, पत्नी आणि नातेवाईक यांनी रमेश पावरा यांच्या घरावर हल्ला केला.

या हल्ल्यात थिक्या पावरा याने त्याच्याकडे असलेल्या धारदार कोयत्याने रमेशच्या मानेवर वार केला. त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर जोरदार वार केले. त्यात रमेश पावरा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रमेश पावरा यांचा मुलगा दिनेश रमेश पावरा (३६) व नातू अंकेश दिनेश पावरा (१०) यांनी रमेश पावरा यांना थिक्या पावरा याच्या तावडीतून सोडविण्यासाठी धाव घेतली असता थिक्या पावरा याच्या मुलांनी व पत्नीने त्या दोघांवरही काठीने व सळईने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले.

घटनेत रमेश पावरा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच थिक्या पावरा व त्याच्या कुटुंबीयांनी पोबारा केला आहे.

याबाबत दिनेश रमेश पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात थिक्या दादला पावरा, सुनील थिक्या पावरा, सायलीबाई थिक्या पावरा, गण्या पाडक्या पावरा, दादला पाडक्या पावरा, गिलदार पाडक्या पावरा, खेमा गण्या पावरा, गुलाब गण्या पावरा, रोहिदास दादला पावरा, खेत्र्या उताऱ्या पावरा, रामदास गिलदारा पावरा यांच्याविरुद्ध खुनासह दोघांना ठार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT