Police pacifying angry crowd outside the police station esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तरुणाच्या खुनाचे शिरपूरमध्ये तीव्र पडसाद; पोलिस ठाण्यावर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : शहरातील क्रांतीनगर येथे शनिवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या तरुणाच्या खुनाचे रविवारी (ता. ५) तीव्र पडसाद उमटले. मृताच्या नातेवाइकांसह नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यावर विराट मोर्चा काढला.

मोर्चा आटोपून संतप्त (Angry) जमावाने खून प्रकरणातील प्रमुख संशयिताच्या शिंगावे (ता. शिरपूर) येथील घरी जाऊन तोडफोड केली. त्यानंतर घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. (Youth murder has strong repercussions in Shirpur Citizens including relatives March on police station dhule crime news)

सात जणांवर गुन्हा

शहराजवळ शिंगावे येथील बालाजीनगरमधील राहुल राजू भोई (वय २२) याचा ४ फेब्रुवारीला क्रांतीनगरमधील भद्रा चौकात खून झाला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात त्याचे वडील राजू गुलाब भोई यांनी फिर्याद दिली. दोन वर्षांपूर्वी दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून संशयित गणेश जगताप व त्याचा भाऊ गोलू यांनी त्यांना मारहाण केली होती.

तेव्हापासून संशयित गणेशने भोई कुटुंबावर राग धरून होता. त्याच वादातून संशयितांनी गुप्ती, चाकूसारख्या हत्यारांनी वार करून राहुलचा खून केला. प्रमुख संशयित गणेश सुभाष जगतापसह दादा पाटील, बंटी पाटील, विक्की दत्तू पाटील, मोहा तथा मोहित धाकड, दीपक धोबी, कोहिनूर राजपूत व इतर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, जखमी झाल्याने उपचार घेण्यासाठी गेलेल्या गणेश जगतापला पोलिसांनी रात्री अटक केली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुन्ह्यात वापरलेला खंजीर रात्री उशिरा फोरेन्सिक विभागाने जप्त केला. आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

जमावाचा मोर्चा

या गुन्ह्यामुळे संतप्त झालेले मृत राहुलचे नातलग व भोई समाजाने रविवारी (ता. ५) सकाळी शिरपूर शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. संशयित गणेश जगतापला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावाने रेटून धरली. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी जमावाची समजूत काढली. अखेर जमाव माघारी फिरला.

मात्र त्यातील काही जण शिंगावे येथील संशयित गणेश जगतापच्या घरावर चालून गेले. गणेशचे कुटुंबीय ४ जानेवारीच्या रात्रीपासूनच बाहेर निघून गेले आहे. जमावाने घराचे कुलूप तोडून टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्वयंपाकघरातील साहित्याची तोडफोड केली. घराबाहेर उभी मोटारसायकलही तोडण्यात आली.

काहींनी घरातील गॅस सिलिंडर पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. सिलिंडरही बाहेर काढण्यात आले. जमावाने घरावर विटांचा मारा केला. बलप्रयोग करून पोलिसांनी जमावाला पिटाळले. मृत युवक व संशयित यांची घरे एकाच गल्लीत असल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : प्रेमविवाहाचा राग, तरुणाला नग्नावस्थेत खांबाला बांधून मारहाण; ५ जणांना अटक

Maharashtra News: वीज चोरी; गुन्हा आणि जीवाला धोका; भारतीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत कठोर शिक्षा

Latest Marathi News Live Update : वर्धा-नांदेड महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

Kolhapur : मिस यू मम्मी, डॅडी..., शिवाजी विद्यापीठात हॉस्टेलमध्ये २३ वर्षीय विद्यार्थीनीनं संपवलं आयुष्य

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

SCROLL FOR NEXT