Superintendent Sanjay Barkund, Inspector Dattatray Shinde and a team present at the Taluka Police Station along with the suspects arrested in the case of kidnapping of the youth esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तरुणाची रेल्वेमधून सुटका; पोलिसांची कामगिरी; तिघे कोठडीत

सकाळ वृत्तसेवा

धुळे : बेपत्ता भावाचा ठावठिकाणा माहीत असूनही नातेवाइकांना माहिती न देता संशयित तिघांनी मित्राचेच अपहरण केले.

त्याला बळजबरीने राजस्थानला नेत असताना माहिती मिळाल्यावर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने झेलम एक्स्प्रेसमधून अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली. या प्रकरणी संशयित तिघांना अटक झाली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. (Youth Save from Train police performance Three in custody Dhule News)

भुरसिंग रमेशचंद्र जोगी (वय २१, रा. दौसा, राजस्थान) महामार्गावर केबल टाकण्याच्या कामासाठी येथे आला होता. त्याच्यासोबत हरिसिंग किशोरराम जोगी (३२, रा. केतकी नांगल, जि. अलवर) व अन्य तिघे कामकाज करीत होते. या चौघांसह हरिसिंगचा भाऊ हा जळगाव येथे काम करीत होता. मात्र, त्या ठिकाणी काहीतरी चोरीचे प्रकरण घडले.

त्या दिवसापासून हरिसिंगचा भाऊ बेपत्ता आहे. त्याच्या नातेवाइकांनी शोध घेऊनही तो आढळला नाही. त्याची माहिती भुरसिंगला असताना तो ती लपवत असल्याच्या संशयावरून हरिसिंगसह तिघांनी भुरसिंगचे १८ नोव्हेंबरला येथील महिंदळे शिवारातील एसआरपी कॅम्पजवळून कारद्वारे अपहरण केले. ही माहिती शरीफ मुन्शीराम यांनी तालुका पोलिसांना दिली होती.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पोलिसांनी भुरसिंगच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता तो राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे समोर आले. त्यानुसार धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजश्री पाटील, हवालदार के. टी. खैरनार, हवालदार राकेश मोरे, कांतिलाल शिरसाट, योगेश पाटील, नितीन दिवसे यांच्या पथकाने सोमवारी (ता. २१) मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरजवळील मुरैना रेल्वेस्थानकावर भुरसिंग जोगी आणि त्याचे अपहरण करणाऱ्या संशयित तिघांना पकडले. या प्रकरणी विजेंद्र बाबूलाल यादव (२६, रा. माचाडी, जि. अलवर), हरिसिंग किशोरराम जोगी (रा. केतकी नांगल, जि. अलवर), हैतराम पप्पूराम यादव (३०, रा. माचाडी, जि. अलवर) यांना अटक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT