Aradhana Mishra esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

आमदार आराधना मिश्रा सांभाळणार काँग्रेस विधिमंडळाची कमान

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार आराधना मिश्रा (Aradhana Mishra) उर्फ ​​मोना या पुन्हा एकदा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असणार आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी आराधना यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी त्यांची उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. आराधना या गेल्या विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या राहिल्या आहेत.

2017 मध्ये भारतीय जनता पक्षानं (BJP) पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केल्यानंतर, अजय कुमार लल्लू यांना कॉंग्रेस (Congress Party) विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यात आलं होतं. परंतु, नंतर त्यांची प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जबाबदारी आराधना यांच्याकडं सोपविण्यात आली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी काँग्रेसनं फक्त सात जागा जिंकल्या होत्या. यावेळी अजय कुमार लल्लू यांचा कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहिराज येथून भाजपच्या डॉ. असीम कुमार यांच्याकडून पराभव झाला. नंतर त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.

यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या, त्यात प्रतापगडच्या रामपूर खास जागेवरून आराधना पुन्हा निवडून आल्या आहेत, तर महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा मतदारसंघातून विजयी झालेले वीरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे दुसरे आमदार आहेत. चौधरी यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकलीय, तर आराधना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आराधना यांचे वडील प्रमोद तिवारी हे देखील दीर्घकाळ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT