Arvind kejriwal Arvind kejriwal
Uttar Pradesh Assembly Election 2022

‘...तर कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास तयार’

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्रिशंकू विधानसभा झाल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. कोणत्याही सरकारमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ते जनतेसाठी करीत असलेले सर्व आश्वासन पूर्ण करतील, जे ते नागरिकांना देत आहेत, असेही केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारासाठी सोमवारी पोहोचले असता लखनौ येथील सभेत ते बोलत होते. एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, केजरीवाल जी, तुम्ही मोठमोठी आश्वासने देत आहात, तुम्ही जिंकाल का? मी म्हणालो भाऊ बघा, जे सर्व सर्वेक्षण येत आहेत, ते दाखवत आहेत की त्रिशंकू असू शकतात. कदाचित कोणालाच बहुमत मिळणार नाही. आम्हाला भाजपला बाहेर ठेवायचे आहे. आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो, तर ज्याचे सरकार असेल त्यांच्याकडून ही सर्व हमी पूर्ण करून देईन, असेही ते (Arvind Kejriwal) म्हणाले.

काल मी ऐकले पंतप्रधान आले आणि म्हणाले की, देशात सायकल चालवणारे सर्व दहशतवादी आहेत. पंतप्रधान सर्व गरिबांना दहशतवादी म्हणत आहेत. जितके लोक सायकल चालवतात, तुम्ही मतदान करताना दाखवून द्या सायकल चालवणारे लोक दहशतवादी आहेत की भाजप (BJP) वाले. विधानसभा असेल तर भाजपला रोखण्यासाठी ते कोणत्याही सरकारमध्ये सामील होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT