Akhilesh Yadav vs Shivpal Yadav esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

भाजप अखिलेशना मोठा धक्का देणार; काका शिवपालांना करणार थेट 'उपसभापती'

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत.

इटावा : निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh Assembly Election) राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. त्यातच आता काका शिवपाल यादव हे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. याच संधीचा फायदा घेऊन भाजप (BJP) शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांना थेट विधानसभेचं उपसभापती बनवू शकतं, अशी चर्चा सध्या जोर धरु लागलीय. मात्र, शिवपाल हे पद स्वीकारण्यास तयार आहेत का? हाही मोठा प्रश्न आहे.

पीएसपी प्रमुख शिवपाल यादव यांची भाजपशी वाढती जवळीक त्यांना उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदावर बसवू शकते, अशी चर्चा यूपीच्या राजकीय वर्तुळात आहे. असं खरंच घडलं, तर शिवपाल त्यांचे पुतणे आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्या जवळ बसतील. म्हणजेच, उपसभापतींची जागा सभागृहातील विरोधी पक्षनेत्याच्या अगदी शेजारी आहे.

पीएसपी प्रमुख शिवपाल यादव इटावा जिल्ह्यातील जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून (Jaswantnagar Assembly constituency) सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नेहमीप्रमाणं यावेळीही शिवपाल सिंह यादव हे समाजवादी पक्षाचं चिन्ह 'सायकल' घेऊन निवडून आलेत.

10 मार्च रोजी झालेल्या मतमोजणीत समाजवादी पार्टी सत्तेपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. तेव्हा शिवपाल यादव यांनी त्यांचे पुतणे अखिलेश यादव यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यामुळं त्यांचं अखिलेश यादव यांच्यापासूनचं अंतर वाढत गेलं. होळीच्या निमित्तानं मुलायम, राम गोपाल आणि अखिलेश यादव यांच्यासोबत सैफईमध्ये होळी खेळणारे शिवपाल 26 मार्चनंतर सपाच्या बैठकीला बोलावलं नसल्याचं सांगून तेथून निघून गेले.

पण, 29 मार्चला बोलावल्यावर शिवपाल यांनी बैठकीला हजर राहण्याऐवजी भर्थनामध्ये भागवतांचं म्हणणं ऐकणं पसंत केलं. त्यानंतर 30 मार्च रोजी शिवपाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT