Yogi Adityanath esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

नवा भारत 'शरियत'नुसार नव्हे, तर संविधानानुसार चालेल : CM योगी

सकाळ डिजिटल टीम

'उद्या सैन्य दलातही कोणी म्हणेल, आम्ही आमच्या धर्मानुसार ड्रेस कोड घालू; पण असं चालणार नाही.'

कर्नाटकातील हिजाब वादावरून (Karnataka Hijab Controversy) राजकारणही सुरू झालंय. हिजाबवरून वाद तापला असताना आता उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Assembly Election) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठं वक्तव्य केलंय. यूपीत 9 जिल्ह्यांतील 55 जागांवर मतदान होत असताना 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी हिजाब वादावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय. शाळेत ड्रेस कोड लागू करायला हवा. राज्यात मी प्रत्येकाला भगवा घालण्याचा आदेश देऊ शकतो का? असा सवालही योगींनी उपस्थित केलाय.

सीएम योगी पुढे म्हणाले, भारताची संपूर्ण व्यवस्था संविधानानुसार (Indian Constitution) चालली पाहिजे. आम्ही आमच्या आवडी-निवडी देश आणि संस्थांवर लादू शकत नाही. त्यामुळं आपल्याला संविधानानुसार चालायला हवं. देशातील प्रत्येक शाळेत ड्रेस कोड (School Dress Code) लागू करायलाच हवा. 'हिजाब' ही शाळेची बाब आहे, शाळेच्या शिस्तीची बाब आहे.

उद्या सैन्य दलातही कोणी म्हणेल, आम्ही आमच्या धर्मानुसार ड्रेस कोड घालू; पण असं चालणार नाही. आम्ही जेव्हा संस्थांचा विचार करतो, तेव्हा संस्थेचे नियम पाळणं गरजेचं आहे. नव्या भारतात सर्वांचा विकास होणार आहे. सरकार सबका साथ, सबका विकास या भावनेनं काम करत आहोत. नवा भारत शरियतनुसार नव्हे, तर राज्यघटनेनुसार चालेल, असंही योगींनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT