Uttar Pradesh Assembly Election Results esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election : सपाचं काय चुकलं; काँग्रेस-बसपाचं काय असणार भविष्य?

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीत भाजपविरोधात अनेक पक्ष एकवटले, पण यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली.

Uttar Pradesh Assembly Election Results : उत्तर प्रदेशातील भाजपच्या (BJP) सलग दुसऱ्या विजयानं त्यांना सध्या 'पर्याय' नसल्याचं सिद्ध केलंय. परंतु, समाजवादी पक्ष (SP), बहुजन समाज पक्ष (BSP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण, त्यांचं भवितव्य आणि आगामी काळात या पक्षांचं महत्त्व किती राहील? अशी चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय. निवडणुकीतील पराभवानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर, ईव्हीएमच्या (EVM) निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. परंतु, भाजपच्या विजयानं उत्तर प्रदेशातील विरोधकांच्या आशेवर पाणी फिरताना दिसतंय.

निवडणुकीत भाजपविरोधात अनेक पक्ष एकवटले, पण यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली. समाजवादी पक्षाच्या मागील वर्षाच्या तुलनेत 47 जागांवरून जवळपास 125 जागा वाढल्या आहेत. त्यामुळं निश्चितच प्रबळ विरोधी पक्ष म्हणून सरकारवर दबाव आणण्याच्या स्थितीत येऊ शकतो, ही समाजवादी पक्षासाठी दिलासादायक बाब आहे. अखिलेश यादव यांचा छोट्या पक्षांशी युतीचा फॉर्म्युला कामी आला, पण त्यांच्यासाठी बसपा आणि काँग्रेस एकत्र आले नाहीत, त्यामुळं नुकसान झालं.

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची संख्या 325 वरून तीनशेवर आलीय. यावरून कुठेतरी जनतेची नाराजी सरकारवर असल्याचं सिध्द झालंय. सपा आघाडीला काही प्रमाणात या निवडणुकीत फायदा झालाय. पण, योगी (Yogi Adityanath) पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असा समज करून बसलेल्यांना हा मोठा धक्का आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि बसपाला सर्वाधिक विचार करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी यावेळी कठोर परिश्रम घेतले. राज्यात काँग्रेसची नव्यानं बांधणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु गेल्यावेळेच्या तुलनेत 4 जागा कमी झाल्या. ती सातवरून तीनवर आलीय. तीच परिस्थिती बसपची झाली. या दोन्ही पक्षांना यूपीत पुन्हा उभं राहणं सोपं नाही, हे उघड आहे. अशा स्थितीत आगामी काळात जर काही आशा असेल, तर त्यांनी पुढील रणनीतीसाठी आत्तापासूनच मेहनत घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT