mamta banarjee mamta banarjee
Uttar Pradesh Assembly Election 2022

‘भाजप बाबासाहेबांच्या संविधानाशी खेळतेय; इतिहास बदलण्याचा प्रयत्न’

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होईल. योगी (yogi adityanath) पुन्हा आले तर तुम्हाला खाऊन टाकतील. तेव्हा अल्पसंख्याकांनी एकजूट होऊन समाजवादी पार्टीला मतदान करायला हवे, असे आवाहना मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी केले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवस आधी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (akhilesh yadav) यांच्यासाठी त्यांनी मत मागितले. मंगळवारी अखिलेश यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सपाला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. एनआरसीच्या वेळी यूपीमध्ये चकमकीच्या नावाखाली किती लोक मारले गेले हे आम्ही पाहिले. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे. येथून भाजप गेल्यास देशातून जाईल. त्यामुळे यूपीमध्ये (uttar pradesh) भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे, असेही ममता बॅनर्जी (mamata banerjee) म्हणाल्या.

जेवढे अल्पसंख्याक भाऊ आणि बहिणी आहेत, मी तुम्हा सर्वांना सांगेन की, इतर कोणाला नाही तर सपाला एकजुटीने मतदान करा. आपल्याकडे इतर जेवढ्या जाती आहेत, मग त्या ब्राह्मण, मुस्लिम, हिंदू, शीख, ख्रिश्चन, दलित, ठाकूर, आदिवासी असोत, मी सर्व जातींना सांगेन की हर हर महादेव म्हणत तुम्ही मोठ्या मनाने पुढे जा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोरोनामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. हाथरसमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल आधी भाजपने माफी मांगावी नंतर मत मांगावे. केंद्र सरकारने सर्वाधिक पैसा उत्तर प्रदेशला दिला, तरीही राज्यात विकास झाला नाही. योगी सरकार कोरोनामधील मृतांच्या अंतिम संस्कारासाठी लाकूडही देऊ शकले नाही, असेही ममता बॅनर्जी (mamata banerjee) म्हणाल्या.

भाजप बाबासाहेबांच्या संविधानाशी खेळतेय

भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले असते तर आम्हाला आनंद झाला असता. भाजपने देशाचे विभाजन करण्याचे काम केले. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. नाव बदलत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी खेळत आहे, असेही ममता बॅनर्जी (mamata banerjee) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT