Mayawati on Priyanka Gandhi CM Teaser google
Uttar Pradesh Assembly Election 2022

'काँग्रेसची अवस्था...', प्रियंका गांधींच्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानावरून मायावतींची टीका

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) असतील, असं बोललं जात आहे. तसे संकेत देखील प्रियंका गांधी यांनी दिलेत. त्यावरूनच आता बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी प्रियंका गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस फक्त भाजप सोडून इतरांच्या मतदारांचं विभाजन करेल, असं मायावती म्हणाल्या.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाची अवस्था इतकी वाईट राहिली आहे की काही तासांतच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराने भूमिका बदलली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी काँग्रेसला मत देऊन आपले मत वाया घालवू नये, तर बसपाला एकतर्फी मत दिलेले बरे होईल. उत्तर प्रदेशात काँग्रेससारखे पक्ष मत कमी करणारे आहेत, असं मायावती म्हणाल्या.

प्रियंका गांधींनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार स्वतः असल्याचे संकेत देऊन खळबळ उडवून दिली. त्यांना काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विचारले असता तुम्हाला माझा चेहरा दिसत नाही का? असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मात्र, ती टिप्पणी सहज आलेली होती. अद्याप मी निवडणूक लढवणार आहे की नाही हे देखील निश्चित झालेले नाही, असं प्रियंका यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावरूनच मायावतींनी प्रियंका गांधींवर टीका केली आहे.

मायावती या विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील भाग असलेल्या करहलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी घेतला आहे. तरीही मायावती निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात 403 विधानसभेच्या जागांसाठी 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 आणि 7 मार्चला सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT