UP Assembly Election
UP Assembly Election esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

मुस्लिम बहुल भागात कोणाचं 'गणित' चुकलं; सपापेक्षा भाजप का ठरली सरस!

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशात सुमारे 20 टक्के मुस्लिम मतदार आहेत.

UP Assembly Election : संपूर्ण निवडणुकीत तीन गोष्टींची जोरदार चर्चा पहायला मिळाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 80 विरुद्ध 20 टक्के अशा वक्तव्यानं निवडणुकीचं (UP Assembly Election) वातावरण तापलं. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले, यूपीमधील 80 टक्के हिंदू भाजपच्या बाजूनं आहेत, त्यामुळं यावेळी 80 विरुद्ध 20 अशी लढत आहे. परंतु, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या मनपरिवर्तनानं तमाम राजकीय पंडितांना आश्चर्याचा धक्का बसला. असं काय झालं की, मुख्यमंत्री मुस्लिमांबाबत मवाळ वृत्ती दाखवली. एका वृत्त वाहिनीशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिमांसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल थेट उत्तर दिलं. ते म्हणाले, मुस्लिम (Muslim) माझ्यावर प्रेम करतात आणि मी मुस्लिमांवर प्रेम करतो, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं वर्णन 80 विरुद्ध 20 असं केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. योगींच्या या विधानाला विरोधकांनी जातीयवादी म्हंटलं होतं. कारण, उत्तर प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या सुमारे 20 टक्के आहे.

यूपीत 20 टक्के मुस्लिम मतदार

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सुमारे 20 टक्के मुस्लिम मतदार (Muslim voters) आहेत. राज्यातील एकूण 143 जागांवर मुस्लिमांचा प्रभाव आहे. त्यापैकी 70 जागांवर मुस्लिम लोकसंख्या 20-30 टक्क्यांच्या दरम्यान आहे, तर 73 जागांवर मुस्लिमांची संख्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. राज्यात अशा सुमारे तीन डझन विधानसभा जागा आहेत, जिथं मुस्लिम उमेदवार निवडणुका जिंकत आहेत. जवळपास 107 विधानसभा जागा आहेत, तिथं मुस्लिम मतदार नेहमीच निवडणूक निकालांवर प्रभाव टाकतात.

30 टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले 'जिल्हे'

मुरादाबाद 50.80 टक्के, रामपूर 50.57 टक्के, बिजनौर 43.04 टक्के, सहारनपूर 41.97 टक्के, मुझफ्फरनगर 41.11 टक्के, शामली 41.73 टक्के, अमरोहा 40.78 टक्के, हापूर 32.39 टक्के, मेरठ 34.43 टक्के, संभल 32.88, बहराइच 33.53 टक्के, बलरामपूर 37.51 टक्के, बरेली 34.54, श्रावस्तीमध्ये 30.79 टक्के मुस्लिम मतदार आहेत.

'या' जिल्ह्यांत 15-30 टक्के मुस्लिम मतदार

तर बागपत 27.98 टक्के, अमेठी 20.06 टक्के, अलीगढ 19.85 टक्के, गोंडा 19.76 टक्के, लखीमपूर खेरी 20.08 टक्के, लखनौ 21.46 टक्के, मऊ 19.46 टक्के, महाराजगंज 17.46 टक्के, पीलीभीत 24.11, संत कबीरनगर 23.58, सिद्धार्थनगर 29.23, सीतापूर 19.93 टक्के आणि वाराणसीमध्ये 14.88 टक्के मतदार आहेत.

2017 मध्ये मुस्लिमबहुल भागात 'मोदी लाट'

2017 मध्ये 'सबका साथ सबका विकास'च्या बाता मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षातील एकही मुस्लिम आमदार विधानसभा जिंकू शकला नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या मोसमात भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नव्हता. 2017 च्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर, इथं भाजपला 325 जागा मिळाल्या होत्या. बसपाला 19 आणि सपा-काँग्रेस आघाडीला 54 जागा मिळाल्या. भाजपच्या या ऐतिहासिक विजयाचा परिणाम म्हणजे, सर्वात कमी मुस्लिम आमदार उत्तर प्रदेश विधानसभेत पोहोचू शकले. 403 सदस्यीय विधानसभेत केवळ 24 मुस्लिम आमदार निवडून आले. यापूर्वीही असंच एकदा घडलंय. 1967 च्या निवडणुकीत सर्वात कमी 23 मुस्लिम उमेदवार विधानसभेत पोहोचले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूनं लागले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ब्रजेश पाठक जवळपास 30,000 मतांनी विजयी झाले. या जागेवर बहुजन समाज पक्षाचे माजीद अली यांना 72,844 मते मिळाली, तर समाजवादी पक्षाच्या माविया अली यांना 55,385 मते मिळाली होती. दरम्यान, भाजपनं अशा 62 जागा जिंकल्या होत्या, जिथं मुस्लिम मतदार लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे.

मुस्लिम बहुल भागात कोण पुढे?

1. बेहट-सपा युतीकडून उमर अली खान

2. सहारनपूर ग्रामीणमधून आशू मलिक- एसपी

3. कैराना- भाजपकडून मृगांका सिंह

4. ठाणे भवन- अश्रफ अली

5. नजीबाबाद- सपाकडून तस्लीम अहमद

6. धामपूर- भाजपकडून अशोक कुमार राणा

7. कांठ- सपाकडून कमाल अख्तर

8. ठाकुरद्वारा- सपाकडून नवाब जान

9. मुरादाबाद ग्रामीणमधून नसीर कुरेशी- सपा

10. मुरादाबाद शहर- युसूफ अन्सारी सपा

11. कुंदरकी- झियाउर रहमान सपा

12. बिलारी- भाजपकडून परमेश्वर लाल

13. संभल-एसपीकडून इक्बाल महमूद

14. स्वार-एसपीकडून अब्दुल्ला आझम

15.चमरौआ- सपाकडून नसीर खान

16. रामपूर- सपाकडून आझम खान

17. अमरोहा - मेहबूब अली- सपा

18. शिवलखास- आरएलडीकडून गुलाम मोहम्मद

19. किथोर- एसपीकडून शाहिद मंजूर

20. रफिक अन्सारी मेरठ- सपा

21. आदिल चौधरी मेरठ दक्षिण- एसपी

22. बागपत- भाजपकडून योगेश धामा

23. धर्मेश सिंह तोमर धौलाना- भाजप

24. बुलंदशहर- भाजपकडून प्रदीपकुमार चौधरी

25. सायना- भाजपकडून देवेंद्र सिंग लोधी

26. कोल-एसपीकडून शाज इसाक अज्जू

27. अलीगढ- सपाकडून जफर आलम

28. फिरोजाबाद- मनीषा भाजपकडून

29. बहेरी - अताउर रहमान- सपा

30. मीरगंज- सुलतान बेग सपा

31. भोजीपुरा- भाजपकडून बहोरनलाल मौर्य

32. शहाजहानपूर- सुरेश कुमार खन्ना भाजपकडून

33. बिस्वान- निर्मल वर्मा भाजप

३४. शहााबाद- रजनी तिवारी भाजप

35. भोजपूर- नागेंद्र सिंह राठोड भाजप

36. इरफान सोलंकी सिसामळ- सपा

37. देवबंद- भाजपकडून ब्रिजेश

38. तिलाई- भाजपकडून मयंकेश्वर शरण सिंह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT