Mamata Banerjee esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

'पश्चिम बंगालप्रमाणं यूपीतही भाजपचा होणार खेला होबे'

सकाळ डिजिटल टीम

यूपी विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत पहायला मिळत आहे.

यूपी विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) मोठी रंगत पहायला मिळत आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून स्वत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. लखनऊमध्ये सपाच्या (Samajwadi Party) बाजूनं प्रचार करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. सपाला पाठिंबा देताना ममता म्हणाल्या, यूपीत मतांचं विभाजन होणार नाही. सपा ही निवडणूक मोठ्या फरकानं जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या, अखिलेशनी अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. त्यामुळं ही निवडणूकही सपासाठी कठिण नाही. या निवडणुकीत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वात सपा 300 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा माझा ठाम विश्वास आहे. पश्चिम बंगालप्रमाणे (West Bengal) उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) भाजपचा 'खेला होबे' होईल. केंद्रीय एजन्सीच्या मदतीनं लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरुय; पण जनता याला भिक घालणार नाही. राज्यात योगींचं सरकार (Yogi Adityanath) आलं तर तुम्हाला ते खातील, असा घणाघातही त्यांनी योगींवर केला. यूपी आमची आई आहे आणि यूपी हे भारताचं हृदय आहे, असंही त्या म्हणाल्या.

यूपीत भाजपचं सरकार आल्यापासून आई-बहिणींचा आदर केला जात नाहीय. कोणी आंदोलन केल्यास त्याला गोळ्या घालून ठार केलं जातं. मात्र, अखिलेश यांच्या सरकारमध्ये हे सगळं मोडून काढलं जाईल. जाट समाज कधीही कुणा पुढं झुकत नाही. आमचे अल्पसंख्याक बांधव आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन समाजवादी पक्षाला मतदान करावं, असा आवाहन करत त्या म्हणाल्या, सर्वच जातीधर्माचे लोक आहेत. मग ते दलित असोत, ठाकूर, ब्राह्मण असोत. या सर्वांनी समाजवादी पक्षाला मतदान करुन काम करण्याची संधी द्यावी. आम्ही गोव्यात निवडणूक लढवत आहोत, पण मी यूपीत आलेय. कारण, यूपीची लढत ही सन्मानाची लढाई आहे, असंही त्या शेवटी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT