Swami Prasad Maurya
Swami Prasad Maurya google
Uttar Pradesh Assembly Election 2022

पक्षानं सांगितलं तरी स्वामी प्रसाद मौर्यांविरोधात प्रचार करणार नाही : भाजप खासदार

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांची कन्या आणि बदायूंच्या खासदार संघमित्रा मौर्य (BJP MP Sanghmitra Maurya) अजूनही भाजपमध्येच आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे देखील आपल्या वडिलांसारखे आहेत, पण पक्षाने विचारले तरी त्या आपले वडील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात प्रचार करणार नाहीत, असं संघमित्रा म्हणाल्या.

उत्तर प्रदेश निवडणुकीत मी भाजपसोबत आहे आणि राहीन. माझ्या वडिलांनी सपामध्ये येण्यापूर्वी कोणतीही चर्चा केली नाही. माझ्यावर भाजप सोडण्याचा कोणताही दबाव नाही. कौटुंबिक जीवन आणि राजकीय जीवन पूर्णपणे भिन्न आहे. मी संपूर्ण राज्यात भाजपचा प्रचार करणार आहे. मात्र, पक्षाच्या सांगण्यावरूनही मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही. मला भाजपच्या लोकांना निष्ठेचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, असंही संघमित्रा म्हणाल्या, त्या एडीटीव्हीसोबत बोलत होत्या.

स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगरच्या पडरौना मतदारसंघातून आमदार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकताच उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. 2016 मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावतींचा बहुजन समाज पक्ष सोडला आणि 2017 च्या यूपी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

स्वामी प्रसाद मौर्य सपामध्ये सामील झाल्याबद्दल संघमित्रा मौर्य यांनी फेसबुकवर एका लांबलचक पोस्ट लिहिली. यामध्ये वडील आणि पक्ष यांच्यातील संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी म्हटले.

वडील आणि मुलीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी माझ्या वडिलांना मुलगी म्हणून दिलेल्या वचनाला मी बांधील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT