Yogi Adityanath,Akhilesh Yadav Esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

...तर योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटले मागे घेऊ - अखिलेश यादव

येत्या १० मार्चला सपावाल्याची सर्व गरमी बाहेर काढू असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्र्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. पण जर कोणी त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी याचिका दाखल केली तर आम्ही त्यांच्याविरोधातील खटल्यांचा पुनर्विचार करु, असं विधान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे. योगींच्या एका टीकात्मक विधानाला उद्देशून अखिलेश यांनी प्रत्युत्तरादाखल हे विधान केलं आहे. (then lets take back cases against Yogi Adityanath says Akhilesh Yadav)

अखिलेश यादव म्हणाले, "जर समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशात सत्तेत आली तर पोलिसांच्या वाहनांची संख्या दुप्पट करण्यात येईल. यामुळं पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेस्थळी पोहोचता येईल. त्याचबरोबर त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर त्यांच्या एका विधानावरुन निशाणा साधला. सपा आणि राष्ट्रीय लोकदलाच्या आघाडीबाबत बोलताना जहरी टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "अखिलेश यादव हे नव्या लिफाफ्यासोबत पुन्हा आलं आहेत. या लिफाफ्यातील सामग्री जुनी, माफियांनी सडवलेली, दंगलीची आहे. येत्या १० मार्चला यांची सर्व गरमी बाहेर काढू"

आदित्यनाथ यांच्या या विधानावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, उत्तर प्रदेशात प्रत्येकाला निगेटिव्ह विचारसरणीच्या लोकांना दूर करायचं आहे. ही निवडणूक संपूर्णपणे बंदुभाव आणि भाजप अशी असणार आहे. भाजपकडून धमकावून निवडणूक लढवली जात असल्यानं याची सर्वांना भीती आहे. बेकायदा दारू व्यवसायामागे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT