UP Assembly Election 2022  esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

BJP-SP समर्थकांत जोरदार हाणामारी; लाठ्या-काठ्यांसह धारदार शस्त्रांचा वापर

सकाळ डिजिटल टीम

मत मागण्यावरुन भाजप आणि सपा उमेदवारांचे समर्थक एकमेकांशी भिडल्याचं सांगण्यात येतंय.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं असून विविध राजकीय पक्ष दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी करत आहेत. दरम्यान, राज्यात निवडणूक हिंसाचाराच्या घटनाही हळूहळू वाढू लागल्या आहेत. यापूर्वी उमेदवारांवर हल्ले झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सीतापूर (Sitapur) जिल्ह्यात अशीच एक घटना घडलीय. इथं भाजप (BJP) आणि सपा (SP) उमेदवारांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. या हिंसक हाणामारीत लाठ्या, धारदार शस्त्रांसह एकमेकांवर हल्ला करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, हाणामारीची ही घटना बिसवान कोतवाली भागातील पिपरी गावामधील आहे. या मारामारीदरम्यान लाठ्या-काठ्यांसोबत धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आलाय. सीतापूरमध्ये मत मागण्यावरुन भाजप आणि सपा उमेदवारांचे समर्थक एकमेकांशी भिडल्याचं सांगण्यात येतंय. या मारामारीत दोन्ही बाजूचे 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलंय.

या घटनेची माहिती मिळताच भाजप उमेदवार निर्मल वर्मा (BJP candidate Nirmal Verma) यांनी कोतवाली गाठून पोलिसांकडं (Police) कारवाईची मागणी केलीय. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेत काही जणांवर गुन्हा दाखल केलाय. हे संपूर्ण प्रकरण बिसवान कोतवाली परिसरातील पिपरी सहदेवा गावातील आहे. पिपरी सहदेवा गावातील रहिवासी असलेले भाजप समर्थक रामू आणि सपाचे समर्थक नसीम यांच्यात मतं मागण्यावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केले. यात रामूसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT