Akhilesh Yadav esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

'सपा'चं सरकार आल्यास Akhilesh Yadav बटाट्यापासून बनवणार दारू

सकाळ डिजिटल टीम

'भाजप सरकारनं आजवर बटाट्यांसाठी काहीच केलं नाही.'

UP Assembly Election 2022 : सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केलीय. निवडणुकांच्या निमित्तानं उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलंय. दरम्यान, प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रथमच पंतप्रधान जाहीर सभा घेणार आहेत. बिजनौर येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षातच खरी चुरस पहायला मिळतेय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी काल रविवारी आग्र्यात जनतेला संबोधित करताना सांगितलं की, उत्तर प्रदेशात सपाचं सरकार आल्यास ते बटाटा प्रक्रिया युनिट (Potato Processing Unit) उभारतील. शिवाय, बटाट्यापासून वाईन (Wine) बनवण्यासाठी वोडका प्लांट (Vodka plant) उभारण्याचं त्यांचं ध्येय आहे.

व्यासपीठावरील पक्षाच्या उमेदवाराची ओळख करून देताना अखिलेश म्हणाले, आम्ही जो उमेदवार दिलाय, ते कृषीचे प्राध्यापक आहेत. त्यामुळं जनतेनं त्यांना आमदार करावं. राज्यात वोडका प्लांट उभारला जाणार असून त्यासाठी लागणारा निधी आम्ही लवकरच उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, एतमादपूर हा बटाट्याच्या पट्ट्याचा भाग आहे; पण भाजप सरकारनं आजवर बटाट्यांसाठी काहीच केलं नाही. सरकार आल्यास आम्ही सिंचनासाठी मोफत वीज देऊ. तसेच 300 युनिट मोफत घरगुती वीजही देण्याचा आमचा मानस आहे. शिवाय, सपाचे सरकार आल्यास १५ दिवसांत शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट, मोफत सिंचन, बिनव्याजी कर्जाची व्यवस्था केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT