UP Assembly Election 2022
UP Assembly Election 2022 esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

उत्तर प्रदेशात EVM बिघडलं; 'सपा'ची निवडणूक आयोगाकडं धाव

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या लोकांनी मुस्लिम मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आलाय.

UP Assembly Election 2022 : पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये (EVM Machine) बिघाड झाल्याचा आरोप होत असून, मतदान न करण्याची धमकी दिली जात आहे. समाजवादी पार्टीनं (Samajwadi Party) आरोप केलाय की, आग्राच्या (Agra) बाह सीटवर एका वृद्ध व्यक्तीनं सायकलवर मतदान करण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकार्‍यांनी कमळाचं बटण दाबलं, असं त्यांचं म्हणणं आहे.

निवडणूक आयोगाकडं (Election Commission) केलेल्या तक्रारीत समाजवादी पक्षानं म्हंटलंय, बाह विधानसभा मतदारसंघाच्या बूथ क्रमांक-126 वर एका 70 वर्षीय व्यक्तीला सायकल चिन्हावर मतदान करायचं होतं, परंतु कर्मचाऱ्यांनी त्याचं मत कमळावर टाकलं. याशिवाय सपानं बाहच्या भाजप (BJP) उमेदवार पक्षालिका सिंह यांच्या पतीवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केलाय. आग्राच्या एतमादपूर सीटवर भाजपचे लोक बूथ क्रमांक 253, 354 वर प्रत्येकी दोन मतं टाकत आहेत. मात्र, पीठासीन अधिकारी त्यांना थांबवत नाही आहेत. त्याचप्रमाणं आग्रा कॅंटमधील बूथ क्रमांक-122, 123 वर भाजपच्या लोकांनी मुस्लिम मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आलाय.

आग्राच नाही तर मेरठसह अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत निवडणूक आयोगाला सपानं पत्र लिहिलंय. सपाचा आरोप आहे की, सरधना सीटच्या बूथ क्रमांक - 22, 125 वर, भाजपचे लोक दलित आणि कश्यप बंधुभगिनींना मतदान करण्यापासून रोखत आहेत. याशिवाय, शिवालखास मतदारसंघातील बूथ क्रमांक 81, 82 वर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांना तुमचं मतदान झालं आहे, असं सांगून परत पाठवत आहेत. निवडणूक आयोगानं बनावट मतदान त्वरित थांबवावं, अशी मागणी सपानं केलीय. सपाच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरूय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

Jackfruit Worst Combination : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचे सेवन करणे टाळा, अन्यथा पचनाच्या समस्यांना मिळेल आमंत्रण

Manoj Jarange : पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

Share Market Opening: शेअर बाजार लाल रंगात उघडला; बँक निफ्टी 48,900च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT