AAP Leader Sanjay Singh Offer To Samajwadi Party Google
Uttar Pradesh Assembly Election 2022

'...तर आम्ही अखिलेश यादवांसोबत जाऊ', AAP नेत्याचं मोठं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election 2022) निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या ७ मार्चला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशातच आम आदमी पक्षाचे (AAP) नेते संजय सिंह यांनी मोठ विधान केलं आहे. त्यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना खुली ऑफर दिली आहे.

भाजपला उत्तर प्रदेशातून घालवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या मदतीची गरज असेल तर आम्ही अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत जाऊ, असं विधान संजय सिंह यांनी केलं आहे. आप उत्तर प्रदेशात देखील पक्षविस्तार करत आहे. लोक विकासाच्या नावावर मतदान करत आहेत. उत्तर प्रदेशातील जातीपातीचं राजकारण संपवलं पाहिजे, असंही सिंह म्हणाले.

जाहीरनाम्यावरून देखील त्यांनी इतर राजकीय पक्षांवर टीका केली. आपच्या निवडणूक जाहीरनाम्याची अनेकांनी कॉपी केली. आमचे यश हेच आहे, की सर्वजण आमचा जाहीरनामा कॉपी करत आहेत. आम्ही वीजबील आणि इतर जी आश्वासन दिलीत तीच आश्वासन इतर पक्षांनी दिली आहेत, असंही सिंह म्हणाले. तसेच पंजाबमध्ये आमचे सरकार स्थापन होईल. उत्तराखंड आणि गोव्यातही सकारात्मक परिणाम दिसतील. कारण, आपचे कामं लोकांपर्यंत पोहोचत आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील हल्ला चढवला. मुख्यमंत्री स्वतःला 'बाबा बुलडोजर' म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. अशा परिस्थिती रोजगार कुठून येणार? त्यांच्या राजकारणाचा उत्तर प्रदेशाला काही फायदा आहे का? असा सवाल देखील सिंह यांनी उपस्थित केला.

येत्या ७ मार्चला उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यासाठी आज सर्वच पक्षाच्या दिग्गजांनी उत्तर प्रदेशात हजेरी लावली. आज पंतप्रधान मोदींचा वाराणतीस रोड शो होता, तर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे देखील उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज काशी-विश्वनाथचे दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT