UP Assembly Election Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election : बाबा का बुलडोझर’ हीट!

भाजपच्या प्रचाराचा ठळक मुद्दा; पाच वर्षांत बेकायदा संपत्तीवर टाच

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: ‘बाबा का बुलडोझर‘ हा उत्तर प्रदेशाच्या रणधुमाळीत परवलीचा शब्द बनला आहे. ‘सपची राजवट म्हणजे गुंड, माफियांची राजवट होती व योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या ५ वर्षांत अशा अनेक गुंडांच्या हजारो कोटींच्या बेकायदा संपत्तीवर बुलडोझर फिरविला आहे` हा भाजपच्या प्रचाराचा अत्यंत ठळक भाग बनला आहे. किंबहुना पाचवा टप्प्यापासून भाजप उमेदवारांनी पोस्टरवरही ‘बाबा का बुलडोझर’चा मुक्त वापर सुरू केला आहे.

योगी यांना सप नेते अखिलेश यादव उपरोधिकपणे बाबा म्हणतात. भाजपने हे नाव उलट अर्थाने प्रचारात आणण्यात यश मिळविले आहे. सप शासनकाळातील गुंडगिरीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यापासून साऱ्याच भाजप नेत्यांनी प्रचारात वापरला आहे. योगी व त्यांच्या टीमने याला बुलडोझरची जोड दिली आहे. किंबहुना निवडणूक पूर्वांचलात पोचता पोचता यूपी भाजपचे चिन्ह कमळ आहे की बुलडोझर अशी शंका यावी असे वातावरण निर्माण झाले. सध्या गजाआड असलेले खासदार आझम खान, मुख्तार अन्सारी व अतीक अहमद या सप नेत्यांची नावे या संपूर्ण राज्यातील गुंडगिरीचे प्रतीक म्हणून भाजप वापरत आहे. ‘यूपी की मजबूरी है, बुलडोझर बहुत जरूरी है’ ही भाजपची प्रमुख घोषणाच बनली आहे. पण भाजपने या यंत्राचा वापर गरिबांना चिरडण्यासाठीच केला आहे, असाही आरोप आहे. भाजपच्या प्रचार विभागाचे प्रमुख व बिहारचे आमदार संजय मयूख यांच्या म्हणण्यानुसार, लोकांनीच योगींच्या बुलडोझरला उचलून धरले आहे. गरिबांना शोषणापासून मुक्त करून त्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला हे पटल्यानेच प्रत्येक सभेत बुलडोझर उल्लेखांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणतात. योगी सरकारने बुलडोझरच्या साहाय्याने गुंडांची १८४८ कोटी रुपयांची बेकायदा संपत्ती जप्त करून पोलिसांनी त्यावर बुलडोझर फिरविला. सरकारने ते गरिबांसाठी वापरले असा भाजपचा प्रचार आहे.

‘बुलडोझर थेअरी’ला प्रतिसाद

गेल्यावर्षी योगी म्हणाले होते की , आमच्याकडे एक विशेष मशीन आहे. ज्याचा उपयोग आम्ही राजमार्ग, एक्स्प्रेस महामार्ग बांधण्यासाठी केला. तसेच लोकांचे शोषण करणाऱ्या माफियांना चिरडून टाकण्यासाठीही आमचे डबल इंजिन सरकार काम करत आहे. याशिवाय योगी आदित्यनाथ हे विरोधक व गुंडांची ‘गर्मी‘ १० मार्चनंतर काढून टाकू, असा इशारा देत आहेत. यांच्या (सप) गुंडांवर कारवाईने तुम्ही आनंदी आहात? हा योगींचा प्रश्न जनता डोक्यावर घेत असल्याचे सांगून, त्यांच्या ‘बुलडोझर थिअरी’ला प्रतिसाद मिळत असल्याचा भाजपचा दावा आहे. या बुलडोझरचा इतका प्रभाव भाजपवर आहे, की भाजप नेत्यांच्या रोड शोमध्येही त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यांच्यापुढे एक बुलडोझर चालविण्याची युक्ती भाजपने वापरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT