ycou1
ycou1 
विदर्भ

यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे मुख्यमंत्री सहाय्यतानिधीला 10 कोटी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राष्ट्रीय आपत्तीत मदतीसाठी कायम आघाडीवर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्‍ट्र मुक्त विद्यापीठाने कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीला 10 कोटी रुपये दिले आहेत. आपत्तीत आर्थिक मदत करणारे हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनला अनुसरून एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही मदत करण्यात येत असल्याचे कुलगुरू प्रा. ई.वायूनंदन यांनी सांगितले. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत करण्याची शिफारस करण्यात आली होती. या बैठकीत कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार, वित्त अधिकारी एम.बी. पाटील उपस्थित होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते या प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्यात आली. राज्यपालांनी घेतलेल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत मदत करण्याचे आवाहन केले होते.


जपली समाजिक बांधिलकी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही मुक्त शिक्षणाकरिता उभारलेली सामाजिक चळवळ आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कोरोना विरुद्धच्या लढ्याकरिता विद्यापीठाने ही जबाबदारी निभावली आहे. यापूर्वीही किल्लारीतील भूकंपग्रस्तांना विद्यापीठाने भरीव मदत केली होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना विद्यापीठाने एक विशेष पथक पाठवून धान्यसामुग्रीचे वाटप केले होते.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन
महाराष्ट्रावर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी राज्यातील विविध विद्यापीठांकडे असलेला आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने 10 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले. त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केले आहे. अन्य विद्यापीठेही आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देतील आणि कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी हातभार लावतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT