12 year girl physical abuse after killed her gondia crime Sakal
विदर्भ

Gondia Crime News : लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या; गोंदियाच्या गोठणपार येथील घटना

विवाहस्थळी आलेल्या एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

लोहारा/देवरी (जि. गोंदिया) : विवाहस्थळी आलेल्या एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी (ता. २०) सकाळी देवरी तालुक्याच्या गोठणपारलगतच्या जंगलात उघडकीस आली. नयना संतोष अर्करा (वय १२, रा. गोठणपार) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या भसबोडन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी व देवरी तालुक्यातील गोठणपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचा लग्नसोहळा शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सात वाजता गोठणपार येथे आयोजित करण्यात आला होता.

या लग्नात नयना अर्करा ही देखील आपल्या पालकांसह उपस्थित होती. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी तिचे अपहरण केले. गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला आणि चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या केली.

दरम्यान, लग्न कार्यात व्यस्त असलेल्या पालकांना जेव्हा मुलगी लग्नस्थळी आढळली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, रात्री कुठेही तिचा पत्ता लागला नाही. गावकरी आणि इतर नातेवाइकांनी शेजारच्या गावातही मुलीचा शोध घेतला.

मात्र, त्याच फायदा झाला नाही. तथापि, शनिवारी (ता. २०) धवलखेडी गावातील गावकरी जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता तिथे त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी चिचगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

सामूहिक अत्याचार झाल्याचा अंदाज

घटनास्थळावरील परिस्थितीनुसार, आरोपींनी मुलीला जंगलात आणल्यानंतर आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असावा, त्यानंतर ती बेशुद्ध पडली असावी आणि हीच संधी साधून आरोपींनी तिचा दगडाने ठेचून खून केला, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आरोपींना पकडून फाशी द्या

या घटनेमुळे देवरी तालुक्यासह गोंदिया जिल्हा हादरला असून, आरोपींना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. सर्वच स्तरातून होत आहे. मृत मुलगी ही कडीकसा येथील शासकीय आश्रमशाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT