14 grampanchayat election without oppose in amravati 
विदर्भ

अमरावतीत १४ ग्रामपंचायतींनी पटकाविला बिनविरोधचा मान, 11 हजार 353 उमेदवार रिंगणात

सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींनी आपल्या शिरपेचात बिनविरोधचा सन्मान पटकाविला आहे. असे असले तरी 4 हजार 452 जागांसाठी  अद्यापही 11 हजार 353 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारण आता चांगलेच तापले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील वादविवाद, तंटे टाळण्यासाठी अनेकांनी याकामी पुढाकार घेतला खरा. मात्र, 553 पैकी केवळ 14 ग्रामपंचायतींनी निवडणुकीला खो दिला आहे. 1215 उमेदवारांनी मैदान सोडल्यानंतर आता 11 हजार 353 उमेदवार रिंगणात आहेत. चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर ठाकले आहे. 15 जानेवारीला मतदान असून 18 ला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

बिनविरोध ग्रामपंचायती -
भानखेडा, सावंगा (अमरावती), नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपानी (नांदगावखंडेश्‍वर), ठाणाठुणी (तिवसा), येरड (चांदूररेल्वे), काशिखेड, निंभोरा बोडखा (धामणगावरेल्वे), दर्याबाद (अचलपूर), वडुरा (चांदूरबाजार), पाडा, लिहिदा (मोर्शी).   

राजकीय हालचालींना वेग - 
नामांकनांची माघार, चिन्हा वाटप यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध क्‍लृप्त्या वापरण्यात येत आहेत, तर अनेकांनी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचासुद्धा आधार घेतला आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकांनी ग्रामीण भागातील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT