विदर्भ

14 लाख 56 हजारांनी फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शीतपेय ठेवण्यासाठी टिनाच्या शेडचे बांधकाम न करता 14 लाख 56 हजार 577 रुपयांनी फसवणूक करणाऱ्या दोन कंत्राटदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल पंचोली व कैलास महाराज धांडू अशी दोन आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू वामनराव डुमरे (49, रा. रचना साहील अपार्टमेट, सुभाषनगर चौक) यांचे एमआयडीसी हद्यीत, ए 1, सेंटर एमआयडीसी रोड, येथे सुपेरियल डिंक्‍स प्रा. लि. नावाची कंपनी आहे. त्यांना मालाची साठवणूक करण्यासाठी, प्लांटची क्षमता वाढविण्यासाठी टिनाच्या शेडची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी आरोपी अनिल पंचोली (रा. रायपुर छत्तीगड), कैलास महाराज धांडू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांना अटी व शर्तीसह टिन शेड बांधकामाचा करार केला. आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेऊन वेळोवेळी 14 लाख 56 हजार 577 रुपये धनादेश व्दारे घेऊन कोणत्याहीप्रकारचे काम न करता फसवणूक केली. हा संपूर्ण प्रकार 12 जून 2018 ते 12 मार्च 2019 च्या दरम्यान घडला. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसंनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT