Amravati Stone Pelting e sakal
विदर्भ

अमरावतीत दोन गटात दगडफेक, कलम १४४ लागू

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : अचलपूरच्या (Achalpur) बिलनपुरा भागात कमानीवर झेंडे लावण्याच्या कारणावरून दोन गटात रविवारी राञी वाद झाला. यामध्ये दगडफेक (Amravati Stone Pelting) देखील करण्यात आली. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. अखेर राञी साडेअकरा वाजतापासून जमावबंदी लागू करण्यात आली.

दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यालयाच्या पोलिस दलासह अकोला पोलिसांनाही अचलपूर आणि परतवाड्यात तैनात करण्यात आले आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांनी सांगितले.

अचलपूर आणि परतवाडा शहरात तसेच देवमाळी व काढली भागात रस्त्यावर जमाव उतरला होता. पोलिसांनी रुट मार्च काढून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. जमाव शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुरांचा वापर केला. त्यानंर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आणखी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश अचलपूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. जमावबंदीचा आदेश लागू असल्याने पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमता येणार नाही. जातीय दंगलीच्या अनुषंगाने फोटो प्रसारित करून किंवा अफवा पसरविणे धार्मिक भावना भडकवणारी कोणतेही कृत्य करणे यावर बंदी घालण्यात आली. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असे बॅनर पोस्टर लावू नये. पोलिसांच्या आदेश उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे, असे अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT