file photo
file photo 
विदर्भ

जीवनरक्षक औषधांचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णसेवेसंदर्भात तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना जबाबदार धरण्यात येते. नुकतेच मेडिकलच्या अतिदक्षता विभागासह कॅज्यअुल्टीमध्ये जीवनरक्षक औषधांचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, अतिदक्षता विभाग तसेच कॅज्युअल्टीत "इमर्जन्सी-ट्रे' आवश्‍यक आहे, या ट्रेमध्ये एट्रॉपिन अत्यावश्‍यक आहे. परंतु, याच जीवनरक्षक औषधाचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मेडिकलच्या अधिष्ठातांनी दोन दिवसांपूर्वी येथील अतिदक्षता विभागात आकस्मिक भेट दिली. या भेटीतून हा प्रकार पुढे आला असल्याची माहिती पुढे आली. विशेष असे की, कॅज्युअल्टीमध्ये आवश्‍यक औषधी उपलब्ध आहेत, किंवा नाही याची पुसटशीही कल्पना वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात नाही. मेडिकलमध्ये सध्या 55 टक्के औषधी असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. मेडिकलचा मेडिसीन विभाग, फारमॅकोलॉजी विभाग तसेच संबंधित डॉक्‍टरांमध्ये समन्वय नसल्यामुळे कोणते औषध कधी उपलब्ध होईल, यासंदर्भात कोणतेही नियोजन नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, गरीब रुग्णांना याचा फटका पडतो. गरीब शेतकऱ्यांना फवारणीदरम्यान शरीरात विष गेले किंवा सर्पदंशामुळे भीती निर्माण झाल्यानंतर एट्रापिनसारखी औषध प्रभावी ठरते. परंतु, हे औषध येथे उपलब्ध नाही. साध्या पोटदुखीवर आवश्‍यक इंजेक्‍शन आणि औषधी "कॅज्युअल्टी'त उपलब्ध नाहीत. जीवनरक्षक असलेली डेक्‍सा, ऍट्रोफिल, डायक्‍नो, ऍसिडिटीवरील उपचारासाठी आवश्‍यक असलेली "रॅनटॅक', उलटी थांबवण्यासाठी आवश्‍यक असलेली "पॅरिनार्म', "कॅल्शियम ग्लुकोनो'ची लस, श्‍वसनाच्या आजारावरील डेरिफायलीन, ऍमिरोफायलीन कॅज्युअल्टीमध्ये उपलब्ध नसल्याने बीपीएलमध्ये मोडणाऱ्या रुग्णांच्या हाती प्रिस्क्रिप्शन दिले जात असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांकडून आली आहे. औषध खरेदीसंदर्भात "फॉर्मक' विभागाकडे बोट दाखवले. परंतु, मेडिकलमध्ये उपचारासाठी येणारा गरीब वर्ग औषध मिळेल, मोफत उपचार होतील या आशेवर असतो. मात्र, येथे रुग्णांची पिळवणूकच होत असते. त्याला या अंतर्गत असलेल्या शीतयुद्धाची माहिती नसते, हे विशेष.
अधिष्ठातांचे खरेदीचे आदेश
मेडिकलमध्ये दर दिवसाला "विष' घेतलेले पाच ते सहा रुग्ण उपचारासाठी येतात. पावसाळा आला आहे. यामुळे अशा शेतकरी रुग्णांची संख्या वाढेल. यामुळे आवश्‍यक जीवनरक्षक औषधांची गरज भासणार आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तत्काळ खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT