representative Image 
विदर्भ

यवतमाळमध्ये तब्बल दोन लाख नागरिकांना टंचाईच्या झळा; गावांत 26 टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : उन्हाची तीव्रता (Summer season) वाढू लागल्याने पाणीटंचाई (Water Crisis) तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढले आहे. सध्यास्थितीत दोन लाख नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकूण 26 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, 115 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (2 lacs people affected due to water crisis in Yavatmal)

जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी असली तरी ती आता जाणवू लागली आहे. जसजसा उन्हाळा तापणार तसतसे टंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी टंचाई कायमच असते. या भागांतील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. यंदाही जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे.

टंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदा पहिला टप्पा निरंक आहे. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्चदरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यात टॅंकर व खासगी विहिरी अधिग्रहणाची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील 26 गावांना 41 फेऱ्यांच्या माध्यमातून 26 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरद्वारे 35 हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे. खासगी विहिरी अधिग्रहण 115वर पोहोचले आहे. एक लाख 67 हजार 842 जणांची तहान त्यातून भागविली जात आहे.

पुसद तालुक्‍यातील 18, आर्णी तालुक्‍यात तीन, यवतमाळ दोन, कळंब, केळापूर व बाभूळगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदाच्या आराखड्यात सर्वाधिक खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल 453 गावांना टंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या गावांसाठी 453 उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, दोन कोटी 27 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदा 589 गावांत पाणीटंचाईची शक्‍यता आहे. त्यासाठी 636 उपाययोजना राबविण्यात येणार असून, सात कोटी 80 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

(2 lacs people affected due to water crisis in Yavatmal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT