2 men are no more in car accident in Yavatmal
2 men are no more in car accident in Yavatmal  
विदर्भ

जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

दीपक फुलबांधे

यवतमाळ : भरधाव वेगातील कार सुरक्षा कठड्यावर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.14) मध्यरात्री दीड वाजता दरम्यान आर्णी मार्गावरील तंदुर वाटीका हॉटेलजवळ घडली. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रवीण हिरामण शिरभाते (वय 47, रा. हेमंत अपार्टमेंट, उज्वलनगर), शुभम दत्तात्रय गादेवार (वय 25, रा. उज्वलनगर), अशी मृतांची नावे आहेत. तर, पंकज शहा, केतन बानोडे दोघेही गंभीर जखमी झाले. दिवाळीच्या आदल्या रात्री चौघेही कारने जेवण करण्यासाठी भांब येथे गेले होते. 

जेवण करून परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार तंदुर वाटीका हॉटेलजवळ असलेल्या सुरक्षा कठड्यावर आदळली. पुढे जाऊन कार पलटी झाली. भीषण अपघातात कारचे दरवाजे उघडल्या गेल्याने चौघेही वाहनाबाहेर फेकल्या गेले. अपघात झाल्याचा आवाज ऐकूण नागरिक हॉटेलबाहेर आले. यवतमाळ ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. 

रुग्णवाहिकेने चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आली. प्रवीण शिरभाते, शुभम गादेवार यांची तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

इंजिनचे झाले तुकडे

व्यावसायिक  असलेले चौघेही जेवण करून यवतमाळकडे परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या भीषण अपघातात इंजिनचे तुकडे झाले. वेग मर्यादा दाखविणारे मिटर शंभरवर ब्लॉक झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT