Thept 
विदर्भ

धाडसी चोरी! छताचे टीन वाकवून केले २० मोबाईल लंपास 

दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : छताचे टीन वाकवून व पीओपी तोडून दुकानातील एक लाख ४९ हजार ४१ रुपये किंमतेचे २० मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. शुक्रवार (ता.२५) ते रविवार (ता.२७) दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी या धाडसी चोरीने पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. 

चोरट्यांनी शहराच्या मध्यभागी शिवाजी चौकात असलेल्या सिध्देश मोबाईल शॉपीवरील छताचे टीन गटांमधून काढून वाकविले आणि त्या खाली असलेले पीओपीचे छत तोडून आत प्रवेश केला. दुकानातील डब्यांमध्ये असलेले विविध कंपनीचे २० मोबाईल लंपास केले. दुकानात सिसिटिव्ही कॅमेरे आहेत. मात्र, डाटा सेव्ह झाला नसल्याने तेही निरुपयोगी ठरले.

शुक्रवारी (ता.२५) रात्री दुकान बंद करून दुकान मालक देशमुख व नोकर घरी निघून गेले. शनिवारी (ता.२५) दुकान बंद होते. रविवारी (ता.२७) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास देशमुख यांनी दुकान उघडले असता त्यांना छत तुटलेले दिसले आणि मोबाईलचे खाली डब्बे टेबलवर पडून होते. त्यांनी याची तक्रार येथील पोलिसात केली. प्रभारी ठाणेदार गोपाल ढोले यांनी तक्रारीची दखल घेत तातडीने घटनास्थळाला भेट दिली. वर्धेच्या ठसे तज्ञांना पाचरण करून ठसे घेतले आणि अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

बंदोबस्ताच्या ठिकाणी झाली चोरी 

शहराच्या मध्यभागी व पोलिस स्टेशनपासून अवघ्या एक फर्लांगांवर ही शॉपी असून शिवाजी चौकात सतत बंदोबस्त राहतो. पोलिसांची गस्तसुद्धा याच ठिकाणावरून सुरू होते. शिवाय या मार्गाने रात्रभर वाहतूक सुरू असते. असे असताना चोरट्यांनी दुकान फोडून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT