23 vaccination centers are closed due to lack of vaccine in amravati  
विदर्भ

अमरावतीत लसींचा तुटवडा, तब्बल २३ लसीकरण केंद्रे बंद; नागरिकांची प्रचंड गर्दी

सुधीर भारती

अमरावती : संपूर्ण राज्यात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा निर्माण झाला असून अमरावती जिल्ह्यातसुद्धा लसींच्या तुटवड्यामुळे 23 लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून याबाबत पुष्टी करण्यात आली आहे. लसीची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख 1 हजार 240 लसींचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात आला होता. आतापर्यंत 1 लाख 69 हजार 889 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मागील तीन दिवसांत लसीकरणाचा वेग वाढल्याने उर्वरित लसींचा वापरसुद्धा करण्यात आल्याने लसींचा अखेर तुटवडा निर्माण झाला. जिल्ह्यातील 123 केंद्रांवरून लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र शुक्रवारपासून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने 23 केंद्रे बंद पडली आहे. 

संपूर्ण राज्यातच लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील 20 ते 23 लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत आरोग्य यंत्रणेला पुन्हा लसींचा पुरवठा राज्यस्तरावरून होण्याची शक्‍यता आहे. असे डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले. 

लसीकरण केंद्रांवर तोबा गर्दी

लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसताच नागरिकांनी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती, याशिवाय 45 वयोगटातील संख्यासुद्धा लक्षणीय होती. उन्हापासून संरक्षणासाठी लसीकरण केंद्रांवर ग्रीननेट, कूलर, थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत फिरावे लागले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT