230 candidates Promises written to Bang political news 
विदर्भ

२३० उमेदवारांनी लिहून दिले वचननामे; ‘ग्राम पंचायत निवडणुकीत आम्ही दारूचा वापर करणार नाही’

संजय तुमराम

चंद्रपूर : गेले काही महिने गडचिरोलीतील दारूबंदी फसवी असून ती उठविण्यात यावी, या संदर्भात विविध चर्चांना ऊत आला होता. त्यामुळेच इथली दारूबंदी विकासाच्या आड येत असल्याने गावपातळीवर उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी संकल्प करावा, यासाठी जिल्ह्यात गावातील निवडणुकीत दारूचा वापर जो करणार नाही, त्या उमेदवारालाच मत देऊ, अशी भूमिका डॉ. अभय बंग यांच्या मुक्तीपथ संघटनेने घेतली. त्यांना प्रतिसाद देत गडचिरोली तालुक्यातील २३० उमेदवारांनी वचननामे लिहून दिले आहेत.

गडचिरोली जिल्हा ३५ वर्षे दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र, या जिल्ह्यात सातत्याने दारू तस्करी व अवैध दारूशी संबंधित गुन्हे घडत असतात. त्यातच सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला आहे. अशा स्थितीत गावपातळीवरील निवडणूक दारूमुक्त व्हावी, यासाठी डॉ. अभय बंग यांच्या मुक्तीपथ संघटनेने मिशन राबविले आहे.

गेले काही महिने गडचिरोलीतील दारूबंदी फसवी असून ती उठविण्यात यावी, या संदर्भात विविध चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळेच इथली दारूबंदी विकासाच्या आड येत असल्याने गावपातळीवर उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी संकल्प करावा, ही यामागची भावना आहे.

उमेदवारी अर्ज जिथे दाखल करायचा आहे, अशा तालुका मुख्यालयी दारूमुक्त निवडणूक संबंधित वचननामा लिहून घेण्यासाठी एक काऊंटर उघडण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुकास्थानी दारूमुक्त निवडणूक अभियानाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

सद्य:स्थितीत सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला आहे. कुठल्याही निवडणुकीत दारूचा वापर उमेदवारांकडून केला जातो. परंतु, दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गावातील निवडणुकीत दारूचा वापर जो करणार नाही, त्या उमेदवारालाच मत देऊ, अशी भूमिका डॉ. अभय बंग यांच्या मुक्तीपथ संघटनेने घेतली. त्यांना प्रतिसाद देत गडचिरोली तालुक्यातील २३० उमेदवारांनी वचननामे लिहून दिले आहेत.

मोहिमेला मोठा प्रतिसाद

निवडून आलो तरीही किंवा अन्यथा दारूमुक्त अभियानाला आपले समर्थन राहील, अशा पद्धतीचे वचननामे उमेदवार अथवा पॅनल प्रमुख भरून देत आहेत. एकट्या गडचिरोली तालुक्यात आतापर्यंत २३० उमेदवारांनी अशा पद्धतीने वचननामे भरून दिले आहेत. तर जिल्ह्यातील २९ पॅनल प्रमुखांनी देखील गावातील निवडणुकीत दारूचा वापर करणार नाही, अशी हमी दिली आहे. तरुण उमेदवारांकडून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT