289 died in road accident in 2020  
विदर्भ

कोरोनात वाचविले, अनलॉकमध्ये गमावले; अपघातात तब्बल २८९ जणांचा मृत्यू

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन घोषित करण्यात आला. नागरिक घरात थांबून सुरक्षित राहिले. याच काळात दुचाकी, चारचाकी वाहनांची चाकेही थांबल्याने अपघाताचे प्रमाण घटले होते. प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. आता अनलॉक होताच दुचाकी, चारचाकी वाहनांचा वेग सुसाट वाढल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातात 289 जणांनी जीव गमावला आहे.

तीन महिन्यांच्या कडक लॉकडाउननंतर हळूहळू अनलॉकप्रक्रिया राबविण्यात आली. आता तर, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोनात सुरक्षित जीवन जगण्याची एक शिस्त लागली होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसुलीची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडण्याचे तरुण टाळत होते. पोलिस रस्त्यावर राहत असल्याने वाहनाच्या वेगावर नियंत्रण आले होते. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहनांचा वेग सुसाट वाढल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागात, महामार्गावर अपघात होत आहेत. वाढत्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. मार्च महिन्यात 22, एप्रिल महिन्यात सहा तर मे महिन्यात 20 जणांचे अपघाती मृत्यू झाले, तर, 2019मध्ये मार्च महिन्यात 27, एप्रिलमध्ये 41 तर मे महिन्यात 43 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. 2019च्या तुलनेत 377 अपघात कमी झाले. त्यात 57 किरकोळ, 37 गंभीर, 55 मृत्यूत घट झाली आहे. कोरोना काळात अपघात कमी झाल्याचे त्यातून दिसते. त्यानंतर आता दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. जीवन अनमोल आहे, आपला जीव वाचविण्यासाठी वेगाशी स्पर्धा करणे टाळले पाहिजे. 

2019 अन् 2020 मधील अपघाताचे प्रमाण -

महिना  2019 मधील अपघाताचे                 प्रमाण 2020 मधील अपघाताचे                  प्रमाण
एकूण अपघात मृत्यू एकूण अपघात मृत्यू
जानेवारी 113 32 88 28
फेब्रुवारी 94 28 93 55
मार्च 83 27 55 22
एप्रिल 87 41 13 06
मे 107 43 24 20
जून 82 35 54 31
जुलै 81 28 31 16
ऑगस्ट 88 20 33 19
सप्टेंबर 80 26 42 23
ऑक्‍टोबर 55 25 69 32
नोव्हेबर 55 25 71 37

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT