Covaxin Sakal
विदर्भ

अमरावतीमध्ये कोव्हॅक्सिन लस नाही, ३२ हजार नागरिक दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्याला गत महिनाभरात कोव्हॅक्‍सिनचे (covaxin) फार कमी डोस उपलब्ध झाले आहेत. आरोग्य विभागाकडून (amravati health department) शासनस्तराकडे मागणी करण्यात आली आहे. अद्याप कोव्हॅक्‍सिन लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कोव्हॅक्‍सिनचा पहिला डोस घेतलेले तब्बल 32 हजार ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत (waiting for second dose) आहे. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची लसीकरण केंद्रावर धाव सुरू आहे. केंद्र सरकारने आधी आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, सहव्याधी असलेल्या व सरसकट 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिली. त्यानंतर 1 मेपासून शासनाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन केले. मात्र, त्यासाठी लशींचे नियोजन करण्यात आले नाही. जिल्ह्याला पुरवठा करण्यात आलेल्या लशींमध्ये कधी कोवीशिल्ड तर कधी कोव्हॅक्‍सिनचा समावेश आहे. (32 thousand people waiting for second dose of covaxin in amravati)

आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार पहिला डोस घेतलेल्या लशीचाच दुसरा डोस घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या काळात कोव्हॅक्‍सिनचा पुरेसा साठा नसल्याने 32 हजार ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. नागरिकांचा जीव टांगणीला लागला. महिनाभरात केंद्र सरकारकडून कोवीशिल्ड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली. मात्र, कोव्हॅक्‍सिनचा पाहिजे त्याप्रमाणात पुरवठा आलेला नाही.

नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती -

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शासनाने केले आहे. लशींचा पुरवठाच नसल्याने जिल्ह्यात सगळ्याच लसीकरण केंद्रावर रांगा लागत आहेत. साठा नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे, लशी वाटपाबाबतचे नियोजनच नसल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात दुसरा डोस कधी मिळेल, याची शाश्‍वतीही नाही. कारण, महिन्याभऱ्यापासून लशीचा पुरेसा साठाच आलेला नाही.

मधल्या काळात कोव्हॅक्‍सिन व कोवीशिल्डच्या साडेचार लाख डोसची मागणी करण्यात आली. त्यानुसार महिनाभरात कोव्हॅक्‍सिनचे केवळ 9 हजार डोस प्राप्त झाले. कोव्हॅक्‍सिनचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्याने सध्या 32 हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी शासनाकडे नव्याने कोव्हॅक्‍सिन व कोवीशिल्डच्या चार लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. लवकरच डोस प्राप्त होण्याची शक्‍यता आहे.
-डॉ. दिलीप रणमाले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup Squad: अजित आगकरने संघ जाहीर केला, तरी १५ जणांमध्ये होऊ शकतो बदल; ICC चा नियम काय सांगतो?

Epstein Files: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूनंतरही ‘काळा इतिहास’ उघड; कागदपत्रे कोण प्रकाशित करत आहे? नेमकी सुत्रे कुणाच्या हाती?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

North Maharashtra : उत्तर महाराष्ट्र गारठला! निफाडचा पारा ५.४ अंशांवर; यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT