399 corona patients found in amravati  
विदर्भ

सावधान! कोरोनाचा रुग्णांचा विस्फोट, रुग्णसंख्या पोहोचली २५ हजारांवर

सुधीर भारती

अमरावती : प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केल्यावरसुद्धा जिल्ह्यातील नागरिक योग्य ती खबरदारी घेत नसल्याने कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रविवारी (ता.14) तब्बल 399 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

जिल्हा प्रशासन तसेच गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांनी अमरावतीत ही दुसरी लाट राहण्याचे संकेत दिले आहेत. असे असतानाही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझरकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची बाजारातील गर्दी कायम असून लग्नसमारंभसुद्धा धडाक्‍यात सुरू आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यात रविवारी 399 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 25 हजार 294 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गत 24 तासांत तीन कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. अमरावतीच्या कृष्णार्पण कॉलनी येथील 64 वर्षीय पुरुष व्यक्तीचा विभागीय संदर्भ रुग्णालयात, राजापेठ येथील नरहरीनगरातील 84 वर्षीय पुरुष व्यक्तीचा एक्‍झॉन रुग्णालयात, तर सातूर्णा येथील 73 वर्षीय पुरुष व्यक्तीचा अंबादेवी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 435 वर पोहोचली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT