4 people did very bad with a man in tivsa amaravati  
विदर्भ

सुट्टीचा दिवस म्हणून तो होता घरीच..अचानक ४ जण घरात घुसले आणि घडली जीवाचा थरकाप उडवणारी घटना..वाचा नक्की काय घडले

प्रतीक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) :  अमरावती जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस गंभीर गुन्हे अमरावती जिल्हयात घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक आणि थरकाप उडवणारी घटना तिवसा येथे घडली आहे. 

शहरात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढतं चालली असून रविवारी दुपारी आंबेडकर चौक येथे ३.३० च्या दरम्यान घरात घुसून एका २८वर्षीय युवकाची घरात घुसून आई वडील आणि बहिणी देखत हत्या केल्याचा थरार घडला आहे.  या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.   हत्या करून पसार झाले आहेत

नक्की काय घडले

अजय बाबाराव दलाल (वय २५ रा.तिवसा) असे मृतक युवकाचे नाव आहेत. प्राप्त माहितीनुसार, सदर मृतक युवक हा रेतीचा व्यवसाय करत होता. आज मृतक युवक घरी असतांना त्याच्या घरी ३ चारचाकी गाड्या आल्या आणि मृतक अजयच्या घरात चार जण घुसून त्याच्या मांडीवर सपासप वार केले. तसेच येथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या डोक्यावर बंदूक दाखवून तुम्ही आडवे येऊ नका असे ठणकावून आरोपींनी सांगितले.  मृतक अजयला सपासप चाकूने वार करून मारेकरी त्याच्या मांडीत चाकू सोडून पळून गेले. मारेकरी यांना मृतकाच्या आई वडिलांनी आरोपींना हटकले असता त्यांच्यावर वाद झाला व आरोपी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने पळून गेले. 

अखेर गमावले प्राण 

मृतक अजयला रक्ताच्या थारोळ्यात पडून होता त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी एसडीपीओ तांबे यांनी भेट दिली तर पुढील तपास तिवसा पोलिस करत आहेत. 

एका युवकालाही नेले उचलून 

अजयवर हल्ला करत घरात असलेला आरिफ नावाचा एक युवक राहतं होता त्यालाही आरोपी उचलून गाडीत टाकून निघून गेलेत. येथील काही नागरिक वाचण्याकरिता पुढाकार घेत असताना हल्ला करणाऱ्यांनी नागरिकांच्या अंगावर पिस्तूल रोखली होती. 

३ दिवसांआधीही होती दहशत 

तीन दिवसा आधी शहरात राऊत नामक व्यक्तीवर जीवघेणी हल्ला झाला होता यामध्ये आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता यामध्ये राऊत यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली होती या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

संपादन  - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT