41 children 16 newborns 3 mother deaths in five months infant mortality maternal mortality in Melghat  sakal
विदर्भ

Melghat News : धक्कादायक ! मेळघाटात पाच महिन्यांत ४१ बाल, १६ नवजात, ३ मातामृत्यू

मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यूचे भीषण वास्तव

राज इंगळे

अचलपूर : १९९३ साली मेळघाटातील आदिवासी भागात कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याची माहिती जगासमोर आली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तेव्हापासून आजपर्यंत मेळघाटात बालमृत्यू होत आहेत. गेल्या पाच महिन्यात ४१ बालमृत्यू, १६ नवजात तर तीन मातामृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मेळघाटात विविध प्रकारच्या योजना अन् त्यावर होणारा खर्च करोडो अरबोच्या घरात आहे. पण मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यू थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतल्या आहेत.

परंतु, मेळघाटात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात ४१ बालमृत्यू झाले आहेत, त्याशिवाय १६ अर्भक मृत्यू झाले आहेत, तसेच ३ मातामृत्यूही झाले आहेत. या झालेल्या मृत्यूमध्ये कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरचा समावेश आहे.

पण मेळघाटात दरवर्षी बालमृत्यू, मातामृत्यू का होत आहेत याचा शासनाने गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणा आरोग्याचा दर्जा सुधारावा, कुपोषण व बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी विविध योजना राबवते.

मात्र त्याचा सकारात्मक परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामागे भ्रष्टाचार हेच कारण असल्याचे लपून राहिलेले नाही. बालमृत्यूची कारणे अनेक असली तरी त्याचे मूळ हे कुपोषणातच आहे. कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरिबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे.

गरिबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मतः ते कुपोषणाच्या विळख्यात अडकत आहेत. बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्यासाठी गरोदर माता, बालकांसह अंगणवाडी मुलं आणि शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार योजना आहे. पण त्यातही भ्रष्टाचार होत असल्याने लाभार्थ्यांच्या पोटात आहार जातच नाही.

शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर

बालमृत्यूसाठी आरोग्य यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. राज्याची आरोग्य व्यवस्थाच अक्षरशः मरणपंथाला लागली आहे. गरिबांना उपचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. एकंदरीत सरकारी यंत्रणेचा कारभार पाहता बालमृत्यू, मातामृत्यू आणि नवजात मृत्यू कसे थांबणार हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT