48 years completed to Melghat Tiger Reserve in Amravati
48 years completed to Melghat Tiger Reserve in Amravati  
विदर्भ

टॉप टेनमध्ये असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला तब्बल ४८ वर्षं पूर्ण; वाघांच्या संख्येतील घट चिंतेची बाब  

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) ः देशातील टॉप टेनमध्ये स्थान असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला 22 फेब्रुवारी रोजी 48 वर्षे पूर्ण झाली. मात्र या 48 वर्षांच्या कालखंडात मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या रोडावत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे विविध उपाययोजना करण्यात येत असल्याने पर्यटकांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे.

मेळघाट व्याघ्रप्रकल्पाची सुरुवात 22 फेब्रुवारी 1972 झाली होती. व्याघ्रप्रकल्प अस्तित्वात येण्यापूर्वी मेळघाटच्या जंगलात 210 वाघ असल्याचे आकडेवारी सांगते. मात्र त्यानंतर दरवर्षी वाघांची संख्या रोडावत चालली आहे. सव्वाशे वाघांची क्षमता असलेला मेळघाट 55 च्या आसपास वाघांवर स्थिरावला आहे. सध्या मेळघाटात केवळ 55 च्या आसपास वाघ असल्याची माहिती अमरावती कार्यालयाकडून मिळाली. 

जंगलात खायला पुरेसे खाद्य नसल्यामुळे वाघांची संख्या रोडावत आहे. कधी उपाशीपोटी, कधी अर्धपोटी राहत असलेला मेळघाटातील वाघ खाद्याच्या शोधात इतरत्र जंगलात निघून जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मेळघाटातील रंगुबेली, हरिसाल, सेमाडोह, जारिदा, माखलासह सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील जंगलाची पत घसरत आहे. जंगलातील काही भागांमध्ये शिकाऱ्यांमुळे जंगलावर ताण वाढला आहे.

 वाघांचा अधिवास सुरक्षित नसल्याने कोकटू किंवा कोअर भागातील दोन-चार अपवाद वगळता मेळघाटातील वाघीण केवळ एक ते दोन पिल्ले जन्माला घालत असल्याची माहिती समोर आली आहे, तर मेळघाटच्या तुलनेत ताडोबात मात्र हीच संख्या तीन ते चार असल्याच्या नोंदी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वाघांच्या अधिवासासाठी सुरक्षित जंगल निर्माण करणे आवश्‍यक झाले आहे.

पर्यटकांच्या संख्येत वाढ

मेळघाटात व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. ज्यामध्ये हरिसाल येथील झोरबी बॉल, आमझरी येथील ऍडव्हेंचर, जंगल सफारी, हत्ती सफारी, हत्ती बाथ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याने व राहण्याची सोय झाल्याने पर्यटकांची संख्या मेळघाटात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही बाब मेळघाटच्या दृष्टीने आल्हाददायक आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT