5 Boys who cross mount Everest are waiting for jobs  
विदर्भ

देशाचा सन्मान वाढवणारे एव्हरेस्टवीर गृह खात्यातील नोकरीच्या प्रतीक्षेत; कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची

आनंद चलाख /मनोज आत्राम

राजुरा (जिल्हा चंद्रपूर) : मिशन शौर्य-2018 अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून विद्यार्थीदशेत देशाचा सन्मान वाढविणाऱ्या एवरेस्ट वीरांना आर्थिक परिस्थितीमुळे शासकीय नोकरीची गरज आहे. देशाचा सन्मान वाढवणारे एव्हरेस्टवीर चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील आहेत. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे या  आदिवासी पंचरत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागाअंतर्गत शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 जिल्ह्याचे माजी पालकमंत्री  सुधिर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, पुढाकारातून  चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी  आशुतोष सलिल तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे तत्कालिन प्रकल्प अधिकारी मा. डि. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या संंयुक्त विद्यमाने  मिशन शौर्य-2018  राबविण्यात आले. 

या मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हृयातील राजुरा विधानसभा क्षेत्राअंतर्गत  कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील दहा आदिवासी विद्याथ्र्यांनी गिर्यारोहणासाठी भाग घेतला होता. 

त्यातील पाच विद्याथ्र्यांनी जागतीक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करून यशाचा झेंडा रोवला व जगाच्या पाठीवर देशाचे नाव उंच केले. विद्यार्थ्यांच्या या कर्तुत्वाने महाराष्ट्राची, चंद्रपूर जिल्ह्याची आणि आदिवासी विकास विभागाची मान अभिमानाने उंचाविली होती. या आदिवासी विद्याथ्र्यांच्या विक्रमी कामगीरीबद्दल भारत देशाचे राष्ट्रपती सन्मा. रामनाथ कोविंद, देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी, देशाचे तत्कालिन गृह मंत्री तथा संरक्षण मत्री सन्मा.राजनाथ सिंग, गृहराज्य मंत्री सन्मा. हंसराजजी अहिर, राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री सन्मा. देंवेद्र फडणविस, राज्याचे तत्कालिन अर्थ, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार तत्कालिन आदिवासी विकास मंत्री सन्मा. प्रा. अशोक उईके, मा. आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांच्या सह संबंधित सर्व अधिका-यांनी सन्मानित करून सन्मानचिन्ह व शासनाकडून या शौर्य विरांना प्रत्येकी 25 लक्ष रूपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते व शासना कडून शिक्षण पात्रतेनुसार गृहविभागात नौकरी देण्याचे ठरविण्यात आले होते.
 
सन्मानाने जगण्यासाठी नोकरीची आवश्यकता 

परंतू अजूनही त्यांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने आता कु. मनिषा धर्मा धुर्वे, उमाकांत सुरेश मडावी, प्रमेश सिताराम आडे, कविदास पांडूरंग काटमोडे आणि विकास महादेव सोयाम या सर्व शौर्य विरांनी विनंती अर्जाद्वारे नोकरी देण्याची मागणी केलेली असून त्यांनी केलेली मागणी त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता अत्यंत रास्त असून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी नोकरीची आवश्यकता आहे.

शिक्षण पात्रतेनुसार द्यावी नोकरी 

या पाचही एव्हरेस्ट विरांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार गृह खात्यात पोलीस-शिपाई किंवा इतर तत्सम पदावर त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून विशेष बाब या सदराखाली शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT