zila-parishad-.
zila-parishad-. 
विदर्भ

सावधान ! कर्मचाऱ्यांनो कार्यालयात वेळेत उपस्थित राहा... अन्यथा

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्याचे "मिनीमंत्रालय' असलेल्या जिल्हापरिषदेतच अनेक कर्मचारी लेटलतीफ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अन्य विभागांमध्ये आकस्मिक भेटींचा सपाटा सुरू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असतानाच आज अध्यक्षांनी अचानकपणे जिल्हापरिषदेच्या मुख्यालयाची नाडी तपासली. आकस्मिक भेटीदरम्यान एक दोन नव्हे तर तब्बल 61 कर्मचारी कुठल्याही परवानगीशिवाय अनुपस्थित असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या सर्वांना नोटीस देण्यात येणार असून त्याची नोंद सेवापुस्तिकेत केली जाणार आहे.

जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोमवारी (ता.27) सामान्य प्रशासन विभाग, लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अमरावती पंचायत समिती, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, पंचायत समिती भातकुली, समाजकल्याण विभाग, बांधकाम तसेच वित्त विभागाला आकस्मिक भेटी दिल्या. या दरम्यान 61 कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असल्याचे हजेरी पत्रकावरून स्पष्ट झाले. अध्यक्ष बबलू देशमुख यांनी अनुपस्थितांना सक्त ताकीद देवून त्याची नोंद सेवापुस्तिकेत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
वेळा पाळाव्याच लागतील
अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे करण्यासाठी त्यांना नेमून दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर असले पाहीजे, हा काटेकोरपणा ते पाळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनःस्ताप सोसावा लागतो. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम प्रशासनाचे आहे, ते त्यांनी पार पाडलेच पाहीजे. आकस्मिक भेटी अशाच प्रकारे सुरू राहील.
- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हापरिषद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT