Wardha Accident Team eSakal
विदर्भ

वर्ध्यात कार अपघातात ७ जण ठार; मृतांमध्ये भाजप आमदाराचा मुलगा

रात्री दीड वाजता घडला अपघात; ४० फुट दरीत कोसळली कार

सुधीर काकडे

वर्ध्यात काल रात्री भीषण अपघात (Wardha Car Accident) झाला आहे. वर्ध्यातील सेलचुरा गावाजवळ (Car Accident in Selsura) हा अपघात झाला असून, या अपघातात एक कार थेट दरीत कोसळली. रात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेले तरुण हे सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचंही प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे.

रात्रीच्या वेळी जंगली श्वापदं वाहनासमोर आल्यानं वाहन अनियंत्रित झालं आणि थेट ४० फुट खोल दरीत ही कार कोसळली. मृतांमध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा पूत्र अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चव्हान (वय 22) रा. गोरखपुर (UP), अविष्कार विजय रहागडाले (वय 21 ) रा. गोंदिया , नितेशसिंग (वय 25 )/रा. राज्य ओडीसा, विवेक नंदन (वय 23 ) ), रा. गया बिहार आणि प्रत्युशसिंग हरेन्द्रसिंग (वय 23) रा. गोरखपुर (UP), शुभम जयस्वाल (वय 23) रा. दिनदयाल उपाध्याथ नगर UP, पवनशक्ती (वय 19) रा.गया बिहार अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

आमदार विजय रहांगडाले यांना तो एकुलता एक मुलगा होता. अविष्कारने दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदियाच्या मनोहरभाई पटेल सैनिकी विद्यालयात घेतले होते. पदवीपर्यंतचे शिक्षणही जिल्ह्यातूनच झाले. सध्या तो वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. अविष्कारच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. दुपारी मृतदेह आणल्यानंतर स्वगावी खमारी येथील स्मशानभूमीत अविस्कारच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

यवतमाळवरून वर्ध्याकडे येत असताना सेलसुरा शिवाराजवळ अचानक जंगली श्वापदं रस्त्यात आले आणि त्यानंतर पुलावर रस्त्याच्या मधोमध असलेले कठडे तोडून कार खाली गेली. यावेळी कारचा अक्षरश: चेंदामेदा झाल्याचं दिसतंय. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT