विदर्भ

वय ७७ अन् कामगिरी सुवर्ण; स्पेनमधील बॅडमिंटनसाठी आजोबा पात्र

अभय भुते

लाखनी (जि. भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील पोहरा गावचे ७७ वर्षीय आजोबा गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी झाले. या कामगिरीमुळे त्यांची स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सुदाम शहारे यांनी गोवा बॅडमिंटन असोसिएशनमार्फत आयोजित स्पर्धेत ७५ वर्षावरील वयोगटात एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान गोव्याचे सतीश कुडचडकर यांचा २१-१३, २५-२३ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांनी चौथे मानांकित गुजरातचे अल्फ्रेड ख्रिस्तीयनला यांना नमविले. यामुळे त्यांची नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. शहारे रोज दोन तास बॅडमिंटनचा सराव करतात व एक तास पोहण्याचा आनंद घेतात. या वयातही त्यांच्यात असलेला उत्साह तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.

प्रोत्साहन देण्यासाठी गावकरी गोव्यात

आपल्या गावातील आजोबा स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती पोहरा येथील गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी सरपंच रामलाल पाठनकर व मंगेश मेश्राम यांच्या पुढाकारातून थेट गोव्याची तयारी केली. सुदाम शहारे स्पर्धा खेळत असताना त्यांना गावकऱ्यांनी प्रोत्साहन दिले व विजयानंतर गोव्यात जल्लोष साजरा केला.

डॉ. सुदामजी शाहरे यांनी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत केलेली सुवर्ण कामगिरी पोहरा गावच्या इतिहासात घडलेली ऐतिहासिक घटना आहे. त्यांच्या विजयानंतर आमच्या गावचे नाव राज्यात अभिमान घेतले जात आहे.
- रामलाल पाठनकर, सरपंच पोहरा
तसा मी मुळात खो-खो व कबड्डीचा खेळाडू आहे. परंतु, वाढत्या वयात हे खेळ खेळणे शक्य नसल्याने पंधरा वर्षांपासून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बॅडमिंटन खेळणे सुरू केले. आता गोव्यात झालेल्या स्पर्धेत सहभागी होत प्रथम आलो. क्रीडा क्षेत्र आपले आरोग्य चांगले ठेवते व ध्येयापर्यंत पोहोचविणारे क्षेत्र आहे.
- सुदाम शहारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT