{"A?":"A","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1615474044731,"A":{"B":{"A":{"A":"MAEYdkWycBM","B":1},"B":{"B":-1.7053025658242404e-13,"D":960,"C":540}},"C":"#ffffff"},"B":960,"C":540} 
विदर्भ

हृदयद्रावक! अचानक विजेचा दाब वाढून दुकानात लागली आग; नऊ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू 

संतोष ताकपिरे

अमरावती ः अचानक विजेचा दाब वाढून घरातील लाइट फुटले. त्यामुळे आग लागून आगीत नऊ महिन्यांची मुलगी गंभीररीत्या जळाल्यामुळे उपचारादरम्यान तिचा जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी (ता 11) मृत्यू झाला.

या घटनेमध्ये मृत मुलीच्या पित्यासह एक युवक असे दोघेही जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुलावंती सुभाष कास्देकर (वय 9 महिने) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेत कुलावंती हिचे वडील सुभाष कास्देकर (वय 35) व त्यांचा भाचा रोशन कंदिरकर (वय 17 दोघेही रा. टाकी, जि. बैतुल, मध्यप्रदेश) हे जखमी झाले आहेत. 

बुधवारी (ता. दहा) रात्री साडेआठच्या सुमारास टाकी गावात ही घटना घडली. श्री. कास्देकर यांच्याकडे किराणा दुकान आहे. दुकानातील लाइट फुटून आग लागली. त्यात चिमुकली कुलावंती ही 80 टक्के, वडील सुभाष हे 2 टक्के तर, रोशन हा 20 टक्के भाजल्या गेले. तिघांनाही बुधवारी रात्रीच उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 11) कुलावंती हिचा मृत्यू झाला. असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. इर्वीनमधील पोलिसांनी घटनेची माहिती मध्यप्रदेशच्या भैसदेही पोलिसांना दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT