93 dengue patients found in yavatmal
93 dengue patients found in yavatmal 
विदर्भ

कोरोनामध्येच डेंगीचाही धोका, यवतमाळमध्ये ९३ रुग्ण

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात डेंगीचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी ऑक्‍टोबर महिन्यात 19 रुग्ण आढळून आलेले आहेत. आतापर्यंत एकूण 93 रुग्ण आढळले असून, हिवताप विभागाने या भागांत प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली आहे. विशेष म्हणजे रुग्ण आढळून आले असले तरीदेखील डेंगीने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

दरवर्षी, पावसाळ्यात डेंगी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे डेंगी रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात 494 डेंगीग्रस्त रुग्ण आढळून आले होते. यंदा जानेवारी ते ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत 93 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील 281 गावे अतिसंवेदनशील आहेत. असे असले तरी यंदा डेंगीचा प्रादुर्भाव कमी करण्यात हिवताप विभागाला यश आले आहे.

डेंगीसाठी अतिसंवेदनशील असलेल्या गावांमध्ये यवतमाळ शहरी भागातील 21, सावरगाव 51, मेटीखेडा 19, नांझा 45, पहूर 13, मांगकिन्ही 12, बोरी अरब 31, हरसुल 36, रामपूर 24, बोरगाव 29, असे मिळून 281 गावे अतिसंवेदनशील आहेत. या गावात हिवताप विभागाच्या वतीने नियमित तपासणी करण्यात आली. अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी टेमिफॉस्टची फवारणी करण्यात आली असून, डेंगी न होण्याच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 

खासगीतील माहितीस विलंब -
यवतमाळ शहरातील काही खासगी रुग्णालयातसुद्धा डेंगीचे रुग्ण आढळून येतात. या रुग्णांची माहिती हिवताप विभागाला नियमितपणे देणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी रुग्णालय ही माहिती देण्यास विलंब करीत असल्याचे समोर आले आहे. अशास्थितीत प्रादुर्भावाची माहिती येण्यात अडचणी येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT