aadarsh Mashte climbed four thousand high peaks
aadarsh Mashte climbed four thousand high peaks 
विदर्भ

#HumanInterestStory : ‘आदर्श’ने ‘समाजापुढे ठेवला आदर्श; महाराष्ट्रातून केवळ दोन तरुणांनी बजावली अशी कामगिरी

साईनाथ सोनटक्के

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : येथील आदर्श साईनाथ माष्टे या तरुणाने मनाली येथील चार हजार २२० मीटर उंच शिखर सर केले. महाराष्ट्रातून केवळ दोन तरुणांनी ही कामगिरी बजावली आहे. पर्वतरांगा सर केल्यानंतर तिरंगा फडकवीत आदर्शने मोहीम फत्ते केली. गोंडपिपरी तालुक्‍यात आदर्शच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अभिनंदन करीत कौतुक केले.

परिवारातील थोरामोठ्यांकडून मिळालेला आदर्श घेत गोंडपिपरी शहरातील आदर्श साईनाथ माष्टे याने हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ग्रीन व्हॅली ऍडव्हेंचर ग्रुपतर्फे आयोजित हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगांमधील माऊंट पतालसू नावाचे चार हजार २२० मीटर उंचीचे पर्वत यशस्वीपणे सर केले. असे करत त्याने युवा पिढीपुढे आपल्या धाडसाचा नवा आदर्श ठेवला आहे. एवढेच नाही तर येत्या दिवसांत अशा धाडसी कारवायात सातत्य ठेवण्याचा त्याचा विचार आहे.

भविष्यात संरक्षण खात्यात काम करण्याची आवड असलेल्या आदर्शला सदैव कुटुंबीयांकडून प्रेरणेचे धडे दिले जात आहेत. आदर्श तोहोगाव येथील भारतीय माध्यमिक तथा स्व. बाजीरावजी मून उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या बारावीचा विद्यार्थी आहे. धाडसी कवायतीची आवड असलेल्या आदर्शला खरी प्रेरणा पुलगावच्या इंडियन मिलिटरी स्कूलमधून मिळाली. तेथील प्रा. प्रवीण शेळके इंडियन माउंटेरिंग फाउंडेशन, दिल्लीचे सदस्य आहेत.

शेळके स्वतःसह धाडसी कवायतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना पर्वतरांगांवरील कवायतीसाठी नेत असतात. यातच आदर्शला धाडसी कवायतीत आवड असल्याने त्याची यासाठी निवड करण्यात आली. यावेळी राज्यातून यासाठी २ मुले, २ मुली आणि स्वतः प्रा. शेळके सरांनी या धाडसी मोहिमेत सहभाग घेतला.

१८ जणांनी घेतला काढता पाय

देशभरातून यात २२ व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यातील १८ व्यक्ती हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगांमधील माऊंट पतालसू नावाचे ४,२२० मीटर उंचीचे पर्वत सर करण्यापूर्वी काढता पाय घेतला. अन्‌ माघारी परतले. मात्र, आदर्श आणि त्याच्या महाराष्ट्रातील इतर सहकाऱ्याने हार न मानता ४,२०० मीटरची पर्वतरांग सर केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT