Aarogya-Setu-app.
Aarogya-Setu-app. 
विदर्भ

मै सुरक्षित, हम सुरक्षित, भारत सुरक्षित, सर्वांना सुरक्षित करणारे आरोग्य सेतू अ‍ॅप

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड कसबा (जि. अमरावती): चला पुन्हा लहान होऊया आणि आपलं दुखणं आपल्यांना सांगूया, जास्त झालं तर दवाखान्यात जाऊया पण कोरोनाला हरवूया, असे भावनिक आवाहन शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आरोग्य सेतू अ‍ॅपमधील व्हिडिओद्वारे सर्व भारतीयांना केले आहे. आतापर्यंत  दहा कोटींपेक्षा अधिक भारतीयांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलेले आहे.
मै सुरक्षित, हम सुरक्षित, भारत सुरक्षित, अशी पंचलाइन दर्शनी भागात दर्शवून आरोग्यसेतू अ‍ॅप सर्वांसाठी कसे महत्त्वपूर्ण आहे. यासंदर्भात अनेक क्षेत्रातील दिग्गज कोरोनाला हरविण्यासाठी लोकांना मानसिकरीत्या सुदृढ होण्याचे आवाहन करीत आहेत. संपूर्ण देशात आजपर्यंत ७५ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून यामध्ये अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून घरातील वस्तूंच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय कसे करायचे? सोबतच आपली सुरक्षा आपण कशी करायची, याबाबतची माहिती दिली आहे.
आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये आपले जीपीएस सुरू असल्यास आपल्या भोवतालच्या अर्धा किलोमीटर ते १० किलोमीटर परिसरात एखादी कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्यास आपणास मोबाईलवर माहिती मिळते. या आजाराबाबत आपल्या मनात काही प्रश्न असल्यास त्याबाबत एफएक्यूद्वारा समाधान होते.
कोरोना होऊ नये, याबाबत काळजी कशी घ्यायची, यासंदर्भात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरपासून ते अनेक दिग्गज लोकांचे व्हिडिओ या अ‍ॅप्सला जोडलेले आहेत. यामध्ये आपली सद्यस्थिती, विविध माध्यमांवर सुचविलेले उपाय, कोविडसंदर्भात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारी आणि ई-पास संदर्भात माहिती दिलेली आहे. तसेच सुरक्षित राहण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यायची, आपली प्रतीकारशक्ती कशी वाढवायची, प्रसिद्ध डॉक्टरांचे मार्गदर्शन, अ‍ॅपचे महत्त्व, अभ्यासाचे विविध केंद्र, आपण सर्व मिळून काय करू शकतो, याबाबत सखोल माहिती दिली आहे.
रिअल बॉडीगार्ड
यामध्ये एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या नजीक असल्यास नोटिफिकेशन देतो, त्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो. ग्राफिक्समुळे अद्ययावत माहिती पटकन कळते, फक्त लोकांनी अचूक माहिती भरल्यास सर्वांना सुरक्षित ठेवणारा हा बॉडीगार्ड आहे, असे वर्धा येथील महेश बाहुटे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - नागपुरात तीन गर्भवती  महिलांना कोरोनाने ग्रासले
सुदृढ आरोग्यासाठी
मी जॉबमुळे पुण्यात अडकली आहे. परंतु या अ‍ॅपमुळे मला कोरोनासंदर्भात अचूक माहिती मिळत आहे. सुदृढ आरोग्यासाठी यामध्ये छान उपाय सांगितले आहेत. रेल्वे किंवा इतर ठिकाणी प्रवास करताना अचूक माहिती देऊ शकते. हा एकप्रकारे माझा स्मार्ट मित्रच आहे, असे प्रणिता कुरळकर यांनी सांगितले.
थोडी अचूकता हवी
मी हे अ‍ॅप नियमित वापरत आहे. १० किमी परिसरात जास्त रुग्ण असल्यास ते अचूक दर्शवत नाही. त्यामुळे यात थोडी अधिक अचूकता असावी, अशी अपेक्षा राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT