auto accident.jpg
auto accident.jpg 
विदर्भ

खासगी बसची धडक अन् दहा फुट घासत गेला ऑटो; सात जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता.23) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटो मधील सात प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अकोला-पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या समोर प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटोला पाठीमागून आलेल्या खासगी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऑटो 10 फूट घासत गेला. त्यानंतर ऑटो खाली रस्त्याच्या कडेला पडला. या भीषण अपघातात ऑटोतील 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींवर उपचार; चालकाविरुद्ध गुन्हा
परीसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला असून, खासगी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

अपघातात हे झाले जखमी
या दुर्घटनेत निंबी येथील रहिवासी कल्पना मनोहर इंगोले, आयुष मनोहर इंगोले, मंजू देशमुख, पुरुषोत्तम तुकाराम इंगोले, लक्ष्मी लहू अबगढ, अश्विनी नेवाने, कविता चौधरी, कमल नेवारे हे गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात भरती केले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT