An accident changed Surajs birthday Yavatmal news 
विदर्भ

३१ जानेवारीला झाला अपघात आणि बदलला सूरजचा वाढदिवस; पाच वर्षांपूर्वीची थरारक घटना

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ : उमरखेड तालुक्‍यातील निंगणूर गाव. याच गावात ३१ जानेवारी २०१५ रोजी शेतशिवारात आईसोबत आलेला चिमुकला खेळता-खेळता बोअरवेलच्या खड्ड्यात पडला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. टीडीआरएफच्या अथक परिश्रमाने तब्बल बारा तास ‘ऑपरेशन सूरज’ मोहीम राबवून तीन वर्षांच्या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले. तेव्हापासून जीवनदान मिळालेल्या तारखेला म्हणजे एक फेब्रुवारीला प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा केला जातो.

सूरज शंकर आखरे हा आता आठ वर्षांचा झाला असून, इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. त्याचा वाढदिवस सोमवारी (ता. एक) टीडीआरएफच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी टीडीआरएफचे प्रमुख हरिश्‍चंद्र राठोड, आई-वडील पुष्पा व शंकर आखरे यांच्या उपस्थितीत केक कापला. सूरजचे आई-वडील मजुरी करीत असल्याने त्याच्या शिक्षणासाठी म्हणून अकरा हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.

सूरज बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या हरिश्‍चंद्र राठोड यांना निंगणूरला पाचारण करण्यात आले. कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसताना जेसीबीने खड्डा खोदला. २४ फुटांवर पाणी लागल्याने मानवी साखळी करून पाण्याचा उपसा करण्यात आला. सूरज अडकून पडलेल्या ठिकाणी जाण्यासाठी आठ फूट भुयारी मार्ग हाताने खोदण्यात आला.

हरिश्‍चंद्र राठोड यांनी भुयारात अनेक अडचणींचा सामना करीत सूरजला रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुखरूप बाहेर काढले. तोच दिवस सूरजसाठी जन्मदिन ठरला. सूरज कुठेही असला तरी दरवर्षी त्याला टीडीआरएफच्या कार्यालयात बोलावून वाढदिवस साजरा केला जातो.

यंदा अकरा हजारांची फिक्‍स डिफॉजिट त्याच्या नावावर करण्यात आली. आई-वडिलांनाही भेटवस्तू देण्यात आली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस, शुभम बैस, सौरभ वडे, मुस्कान सय्यद, विकास दहाट, श्रद्धा बोढाले आदींची उपस्थिती होती.

रडूही आवरता येत नव्हते
सूरज बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आमचे अवसान गळून पडले. मुलगा सुखरूप बाहेर निघेल की नाही, याची कोणतीही शाश्‍वती नव्हती. आतमध्ये त्याची होत असलेली अवस्था बघून रडूही आवरता येत नव्हते. तो दिवस आजही आठवल्यास अंगावर काटे येतात. हरीश राठोड यांच्या परिश्रमामुळे आज आमचा मुलगा दिसत आहे.
- पुष्पा शंकर आखरे,
सूरजची आई, निंगणूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

Baramati News : सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर बारामतीत ‘इनोव्हेशन व्हॅली’ उभारणार! शरद पवार यांची घोषणा....

Pune Crime : अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा निर्घृण खून; तिघेजण ताब्यात

Jharkhand Health : जिल्हा रुग्णालयांत सुरू होणार DNB पदव्युत्तर अभ्यासक्रम; आरोग्य विभागाचा पायलट प्रोजेक्ट

Farmer Scheme: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून 5,000 रुपये मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT