Accident near Sindewahi Chandrapur 5 people no more  
विदर्भ

ब्रेकिंग : लग्नाला जाताना अचानक उलटला मिनीट्रक; ५ जणांचा जागीच मृत्यू तर २० जण जखमी 

सकाळ डिजिटल टीम

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून आपल्या गावाकडे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटून चौघे ठार, तर चौदा जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. 25) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कच्चेपार-कारगाटा मार्गावर घडली. मृतांत रघुनाथ मारोती कोराम (वय 40 रा. एकरा), साहिल विनोद कोराम (वय 12 रा. एकरा), कविता संजय बोरकर (वय 35) आणि वीणा घनश्‍याम गहाणे (वय 26) यांचा समावेश आहे. अपघातातील जखमींना सिंदेवाहीहून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील एकारा येथे आरसोडे कुटुंब राहतात. आरसोडे कुटुंबातील सुभाषचा विवाह सिंदेवाही तालुक्‍यातील रत्नापूर येथील लोधे कुटुंबातील मुलीशी ठरला होता. गुरुवारी (ता. 25) सकाळी विवाहसोहळा होता. लग्नासाठी रत्नापूर येथे जाण्यासाठी आरसोडे कुटुंबीयांनी एक मिनी ट्रक केला होता. एमएच 31 सी. क्‍यू 3915 या क्रमांकाच्या मीनी ट्रकने वऱ्हाडी रत्नापूरला सकाळीच निघाले.

या मीनी ट्रकमध्ये जवळपास पन्नास वऱ्हाडी होते. ठरल्याप्रमाणे लग्नसोहळा व्यवस्थितरित्या पार पडला. तो आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन मीनी ट्रक एकारा गावाकडे जाण्यास निघाला. कच्चेपार-कारगाटा मार्गावरून मीनी ट्रक जात असतानाच चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मीनी ट्रक रस्त्यावरच उलटला. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

सिंदेवाही तालुक्‍यातील कच्चेपार-एकारा हा रस्ता वळणाचा आहे. त्यामुळे नवीन चालकांना या रस्त्याचा अंदाज लागत नाही. यातून कित्येकदा अपघात होतात. आरसोडे कुटुंबांच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा मिनी ट्रकचा चालक हा मद्य प्राशन करून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर त्याचे नियंत्रण सुटले आणि मिनी ट्रक उलटला. अपघातानंतर चालक पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहे

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT