Accident near Wardha and Amravati border girl no more  
विदर्भ

ब्रेकिंग: वर्धा-अमरावती सीमेजवळ भीषण अपघात; १५ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू २ जण जखमी  

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) :  जिल्ह्याच्या सीमेवर आज 3:30 वाजताच्या सुमारास नजीकच्या भिष्णुर फाट्यावर एका दुचाकीचा अपघात होऊन एक मुलगी जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मृतक मुलीचे नाव कु.रुपाली योगेश लसंनकर वय 14 वर्ष रा.खापरखेडा नागपूर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले तर जखमी मध्ये  मंगेश उध्वव लसनंकर वय 35 वर्ष रा खापरखेडा, व बेबी उद्धव लसनकर वय 55 वर्ष रा खापरखेडा असे असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

नागपूर वरून आपल्या दुचाकी क्रमांक एमएच  40 एएन 5781 प्लसर वाहनाने खापरखेडा येथून अचलपूर येथे जात होते. तेव्हा भारवाडी नजीक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भिष्णुर फाट्याजवळ वाहणावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या खाली उतरले व अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. 

घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या नागरिकांनी पोलिस आणि रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिल्याने तळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. जखमींना तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये 14 वर्ष वय असलेल्या कु.रुपालीचा मृत्यू झाला तर  दोन जणं गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT