Accidental death of two youths in Chandrapur district 
विदर्भ

सकाळी फिरायला गेलेल्या युवकांचा अपघाती मृत्यू; खरकाडा गावावर शोककळा

प्रमोद काकडे

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरालगत मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना पुढे आली आहे. ब्रह्मपुरी-आरमोरी मुख्य महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही मृत युवक याच महामार्गावरील खरकाडा या गावचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरकाडा गावचे युवक नेहमीप्रमाणे मुख्य महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना अज्ञात वाहनाने मागून युवकांना जबर धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोन्ही मृतदेह ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठवले. चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याने अज्ञात वाहनाचा शोध ब्रह्मपुरी पोलिस घेत आहेत. एकाच दिवशी खरकाडा गावातील दोन युवकांचे अपघाती निधन झाल्याने परिसरातील नागरिकांना शोकाकुल करून गेले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT