Accidental death of youth in Bhandara and Wardha district 
विदर्भ

...अन्‌ साखरपुड्याच्या दिवशीच निघाली अंतयात्रा

सकाळ वृत्तसेवा

मोहाडी (जि. भंडारा) : युवकाचा 27 जानेवारीला साखरपुडा होणार होता. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी, 26 जानेवारीला तो एका कार्यक्रमाला गेला होता. कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येत असताना वाटेत अपघात झाला. यात युवकाचा मृत्यू झाला. जितेंद्र सोपान बोंद्रे (वय 29) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे मृत आणि लग्न ठरलेल्या युवतींच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

भंडारा तालुक्‍यातील चिचखेडा येथील जितेंद्र सोपान बोंद्रे (वय 29) याचा सोमवारी (ता. 27) सकरला (ता. मोहाडी) येथील युवतीशी साखरपुडा होणार होता. जितेंद्र हा मित्र प्रशांत पडोळेसह रविवारी (ता. 26) पौंडदौना (ता. मौदा) येथे परमात्मा एक सेवक संमेलनाच्या कार्यक्रमाला गेला होता. कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत असताना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मधूबन हॉटेल जवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात जितेंद्रचा मृत्यू झाला.

प्रशांत पडोळे हा गंभीर जखमी झाला आहे. मृत जितेंद्र हा हल्दीराम कंपनीत कामावर होता. जितेंद्र व प्रशांत हे दोघेही परमात्मा एक संमेलनाचे सेवक आहे. या घटनेमुळे मृत आणि लग्न ठरलेल्या युवतीच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. 


नाल्यात कोसळल्याने गेला जीव

सेलू (जि. वर्धा) : हिंगणीवरून शिवनगाव मार्गे दुचाकीने रात्रीच्या सुमारास निघालेल्या युवकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने वाहन नाल्यात कोसळले. प्रशांत हरीभाऊ कुकुड्डे याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. प्रशांत हा तालुक्‍यातील ब्राह्मणी गावचा रहिवासी असून, कबड्डी खेळत होता. प्रशांत 26 जानेवारीच्या रात्री हिंगणी येथून सेलडोह नजीकच्या नवीन पुनर्वसन वस्तीकडे दुचाकीने गेला होता. हिंगणीपासून काही अंतरावर असलेल्या नाल्याजवळ दुचाकीवरून ताबा सुटल्याने तो दुचाकीसह नाल्यात कोसळला. रात्रभर तो पाण्यात पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे खापरी येथील शेतकरी शेतात जात असता त्यांना नाल्यात मृतदेह पडून दिसले. त्यांनी याची माहिती खापरीचे पोलिस पाटील व सरपंच प्रमोद गव्हाळे यांना दिली. या घटनेबाबत सेलू पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT